• Sat. Sep 21st, 2024
गाय शोधायला गेलेला १३ वर्षीय मुलगा परतलाच नाही, जे घडले ते पाहून कुटुंबीय हादरले

बुलढाणा : ज्या पावसाची चातकाप्रमाणे सर्वत्र वाट पाहिल्या जात होती त्याच पावसाने मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यात मुसळधार पावसात अडकून पडलेल्या एका तेरा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, संध्याकाळच्या वेळेस दाटून आलेले ढग आणि घरातील गाय शोधण्याकरता गेलेला तेरा वर्षीय जय मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अडकून पडला. कुटंबीय घरी वाट पाहत बसले होते. उशीर झाला नंतर शोधा शोध सुरू झाला.आणि त्यानंतर आज सकाळी नदीच्या काठी झुडपामध्ये जय सापडला.

सीमा हैदरला पाकला पाठवा, नाहीतर २६/११ सारखा हल्ला करू; मुंबई पोलिसांना धमकीचा फोन
ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ढोरगाव परिसरातील आहे. खामगाव तालुक्यातील ढोरपगाव नजीकच्या नाल्याला काल बुधवारी आलेल्या पुरात वाहून गेलेल्या १४ वर्षीय बालकाचा मृतदेह आज आढळून आला. यामुळे ढोरपगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. यादरम्यान खामगाव तालुक्यातील ढोरपगाव येथील नाल्याला काल संध्याकाळी पूर आला. पुरात गावातीलच १४ वर्षीय जय विठ्ठल तायडे हा वाहून गेला होता. त्याचा गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही.

Raj Thackeray: अरे हा मुख्यमंत्री तात्पुरता मी पर्मनंट अधिकारी; राज ठाकरेंची मुख्यमंत्री, फडणवीसांवर टीका
दरम्यान, आज सकाळी नाल्याच्या काठी झुडपामध्ये जय याचा मृतदेह आढळून आला आहे. याची माहिती मिळताच नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महिलांनी एकच आकांत केला.

तायडे यांच्या घरात दोन मुली मिळून जय हा एकुलता एक मुलगा होता. जयच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे.

मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; EWS घटकांच्या उत्पन्न निकषात मोठा बदल, लाखो नागरिकांना फायदा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed