• Mon. Nov 25th, 2024

    Crime News: सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, मग डोक्यात चाकूने वार; जावयासोबत घडलं भयंकर

    Crime News: सासू-सासऱ्यांकडून बेदम मारहाण, मग डोक्यात चाकूने वार; जावयासोबत घडलं भयंकर

    छत्रपती संभाजीनगर : माझ्या मुलीला त्रास का देतो? असा जाब विचारत सासरच्या लोकांनी जावयाला दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जावयाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना अंबेलोहळ (ता. गंगापूर) येथे घडली. याप्रकरणी संतप्त नातेवाईकांनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घाटीत गोंधळ घातला. अनिल शालीन पिंपळे (वय ३१ रा. अंबेलोहळ गंगापूर) असे मृताचे नाव आहे.
    समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; अचानक लेन बदलली, पिकअपची जबर धडक; एकाचा मृत्यू
    अंबेलोहळ येथे शेती करणारे अनिल यांचा काही दिवसांपासून पत्नी गीता पिंपळे हिच्यासोबत वाद सुरू होता. गीता ही त्यांची पहिली पत्नी होती. आणि तीन वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्यामुळे अनिल हा दुसऱ्या पत्नीसह राहत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्यातला वाद मिटवण्यात आला होता. मात्र, अनिल हा पुन्हा त्रास देत असल्याचे पत्नी गीताहिने माहेरी सांगितलं. यामुळे संतापलेली सासरची मंडळी म्हणजे सासरे संजय लक्ष्मण चव्हाण, सासू पारूबाई संजय चव्हाण, मेव्हणा कृष्णा संजय चव्हाण, साडू करण भिमा पवार हे अनिलच्या घरी आले.
    खासगी ट्रॅव्हल्स अन् ट्रकची जोरदार धडक, समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; २० प्रवासी जखमी
    मुलीला त्रास का देतो असे म्हणत त्यांनी जावई अनिल याला मारहाण सुरू केली. सासरे संजय चव्हाण आणि सासू पारूबाई हे मारहाण करू लागले. कृष्णा चव्हाण याने लाकडी दांड्याने पायाच्या गुडघ्या आणि दोन्ही हातांवर मारहाण केली. यामुळे अनिल कोसळला. त्याच्या हाताला आणि पायाला जबर इजा झाली अन् हाड मोडले. तर साडू करण निमा पवार याने चाकूने डोक्यात आणि उजव्या पायाच्या पोटरीवर वार केला. आणि या चाकू हल्ल्यात तो रक्तबंबाळ झाला, असा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीच्या आवाजाने आजूबाजूचे लोक धावत आले आणि त्यांनी अनिलला सोडवलं. जखमी अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    पोरीनं नाव मोठं केलं; ना क्लास,ना सोयी-सुविधा, भाजी विक्रेत्याच्या लेकीनं पहिल्याच प्रयत्नात खाकी मिळवली

    नातेवाईकांचा घाटीत गोंधळ

    गंभीर जखमी अनिल पिंपळे याच्यावर घाटीत उपचार सुरू होते. अति रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती खालावली. आणि बुधवारी रात्री अनिलचा मृत्यू झाला. यामुळे अनिलच्या नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली. शेकडो नातेवाईक घाटीत जमा झाले होते. घाटीत गोंधळ सुरू असल्याचे समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, सहाय्य पोलीस निरीक्षक वाहुळ यांनी सहकाऱ्यांसह घाटीत धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना समजावण्याचा प्रयत्न केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *