• Sat. Sep 21st, 2024
भीमाशंकरला जाताना एसटीला पुण्यात अपघात, ३५ प्रवाशांसह बस २० फूट खोल कोसळली

पुणे: कल्याण येथून भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला. पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे असणाऱ्या ओढायावरून बस थेट वीस फूट खोल खाली कोसळली आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून बसमधून एकूण ३५ जण प्रवास करत होते. सुदैवाने सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास हा अपघातात घडला. प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळाल्याने पुढील दुर्घटना टळली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कल्याण येथून भीमाशंकर येथे निघालेल्या बस चालकाचे नियंत्रण आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावाजवळ असणाऱ्या ओढ्यात सुटले. त्यामुळे बस वीस फूट खोल दरीत कोसळली. यात पाच जण जखमी झाले आहेत. तर अन्य सुखरूप आहेत. बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी प्रवास करत होते.

Nashik Bus Accident: सप्तश्रृंगी आईनेच भक्तांना संकटातून तारलं, बस दरीत कोसळूनही २२ जण बचावले
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी दाखल झाले. तसेच पाच रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या असून जखमींना घोडेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी दाखवलेली सतर्कता यामुळे या जखमींना वेळेत उपचार मिळू शकले.

४०० फूट खोल दरीत एसटी कोसळली, कंडक्टरनं सांगितलं अपघाताचं कारण

महामंडळाची ही बस कल्याण येथून भीमाशंकला जात असताना हा अपघात घडला आहे. सुदैवाने यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालं नाही. तर आरोग्य विभागाच्याही रूग्णवाहिका तात्काळ दाखल झाल्याने मोठा धोका टळला आहे. एसटी बसच्या अपघातात दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे.

बायको सोडून गेली, घरी दोन कॉलगर्ल बोलवू लागला; ‘त्या’ रात्री भलतंच घडलं, त्याने प्राण गमावला

चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. या घटनेने एकच धावपळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed