नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभेच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे पुत्र हर्षल रमेश गावित यांचे अल्पशा आजाराने काल बुधवारी (ता.१२) निधन झाले. ते अवघ्या ३८ वर्षांचे होते. आठवडाभरापासून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज गुरूवारी (ता.१३) सकाळी ११ वाजता नाशिक अमरधाम येथे अत्यंसंस्कार केले जाणार आहेत. दिवंगत केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे हर्षल गावित हे नातू होते.
हर्षल गावित काहीकाळ काँग्रेसमध्ये सक्रीय होते. त्यांनी महापालिकेची निवडणुक देखील लढविली होती. त्यांच्या पश्चात, पत्नी, एक मुलगा, आई निर्मला गावित, वडील रमेश गावित, बहिण जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष नयना गावित असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

हर्षल गावित यांनी जिल्हा परिषद आणि नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. या दोन्हीही निवडणुकीत ते पराभूत झाले होते.
काँग्रेसचे युवानेते अशी ओळख
कोरोना कालावधीत हर्षल यांना कोविड ची लागण झाली होती. त्यानंतर ते विजनवासात होते. जिल्हा परिषदेसाठी ठाणेपाडा (हरसूल ) येथून २०१७ ला त्यांनी निवडणूक लढवली होती. हर्षल गावित यांची काँग्रेसचे युवानेते अशी ओळख होती.