• Sat. Sep 21st, 2024
सिनेमाच्या शोदरम्यान हाणामारी, दाम्पत्याने तरुणाला बुकललं, कारण काय?

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : प्रख्यात दिग्दर्शक केंदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट चांगलीच गर्दी खेचत आहे. या चित्रपटाच्या शोदरम्यान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील सायन भागात असलेल्या पीव्हीआर चित्रपटगृहात मंगळवारी हा प्रकार घडला.

चित्रपट सुरू असताना पाठीमागे बसलेल्या एका लहान मुलीचा पाय सीटला लागत होता. यावरुन झालेल्या वादातून एका दाम्पत्याने केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला आहे. सायन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले.

पीव्हीआर चित्रपटगृहात रविवारी रात्री ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा शो सुरू होता. यावेळी एका दाम्पत्याच्या पाठीमागे बसलेल्या लहान मुलीचा सीटला पाय लागत असल्याने या दाम्पत्याने वाद घालण्यास सुरुवात केली. मुलीसोबत बसलेल्या एकाने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र हे दाम्पत्य ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

आदेश बांदेकरांच्या लेकासोबत दिसलेली ती परदेशी मुलगी आहे तरी कोण? सोहमला द्यावं लागलं स्पष्टीकरण
दाम्पत्याची समजूत काढण्यासाठी या तरुणाने त्यांना चित्रपटगृहाच्या बाहेर नेले. मात्र तेथे या दाम्पत्याने तरुणाला छत्रीने आणि हाताने मारहाण केली. तरुण जखमी झाल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. सायन पोलिसांनी चित्रपटगृहात धाव घेत मारहाण करणाऱ्या दाम्पत्यावर कारवाई केली.

३० जून रोजी प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यातही हाऊसफुल्ल होत आहे. आतापर्यंत या सिनेमाने जवळपास ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात सहा बहिणींची गोष्ट सांगण्यात आली आहे.

डोळ्यातील अश्रू सांगतायंत काम न मिळाल्याची खंत; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची अशी झालीये अवस्था
रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब या अभिनेत्रींच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. याशिवाय सुरुची आडारकर, शरद पोंक्षे, तुषार दळवी, रुचिता जाधव, पियुष रानडे, सोहम बांदेकर, ज्युलिया मोने यासारखे कलाकारही सिनेमात झळकले आहेत.

अक्षय कुमारची बॅग पाहून फोटोग्राफर्स म्हणाले, सेक्सी बॅग

‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने ९ जुलै रोजी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ६.१० कोटी रुपयांची कमाई केली. एखाद्या मराठी सिनेमाने एका दिवसात केलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. या सिनेमाची सोमवारी १० जुलैपर्यंतची कमाई २८.९८ कोटी रुपये इतकी आहे. मराठीच नव्हे बॉलिवूडमधूनही केदार शिंदेंच्या सिनेमाचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed