• Sat. Sep 21st, 2024
मराठा महासंघाचे २५ जुलैला दिल्लीत आंदोलन; हजारो कार्यकर्ते होणार सहभागी, जाणून घ्या कारण

अहमदनगर: मराठा समाजाला आरक्षण तातडीने आरक्षण द्यावे, ओबीसी कोट्याला धक्का न लावता नवीन धोरण तयार करून हा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करत मराठा महासंघातर्फे नवी दिल्लीत २५ जुलै रोजी जतंरमंतर मैदानावर तीव्र आंदोलन केले जाणार आहे. राज्यातून हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी दिली आहे.
बंडानंतर पवारांसोबत गाडीत फिरले; २४ तासांतच अजितदादांना पाठिंबा, आता ‘अशी’ झाली पंचाईत
मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला २०१४ साली १६ टक्के आणि त्यानंतर २०१९ मध्ये १२-१३ टक्के आरक्षण देण्यात आले होते. दोन्ही वेळा ५० टक्केच्या वर मर्यादा वाढवून दिलेले आरक्षण कोर्टात टिकले नाही. त्यामुळे आता ५० टक्केच्या आत आरक्षण द्या किंवा घटना दुरुस्ती करा. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली पुनर्याचिका देखील फेटाळली आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर महाराष्ट्रातील मराठा समाज, हरियाणातील जाट समाज, राजस्तानचा राजपूत समाज, कर्नाटकांचा राज्यू समाज, मनियार समाज, पटेल समाज, काही अंशी कुर्मी समाज आणि इतर आरक्षणापासून आरक्षण वंचित समाज यांना सुध्दा आरक्षणाचा फायदा मिळावा हीच मराठा महासंघाची भुमिका आहे.

पद्मसिंह पाटील दुरावले, पण भाच्याने राष्ट्रवादीची पताका फडकवत ठेवली

ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यास विलंब लागणार असेल तर धोरणात बदल करा. मात्र आरक्षणातून वंचित असलेल्या मराठा समाजासह देशातील सर्व वंचित समाज घटकांना नोकरी, शिक्षण यामध्ये आरक्षण द्यावे, अशी अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी आहे. ५० टक्केच्या आत आरक्षण असले पाहिजे अशी जनभावना मराठा महासंघाची आहे. तरच ते सुप्रीम कोर्टात टिकेल किंवा घटना दुरुस्ती करावी. सततची आंदोलने, मोर्चे बंद याचा झालेला अतिवापर यामुळे आज मराठा समाजातील कायकर्ते आंदोलन करणार आहेत.

यात मागणीसाठी मराठा महासंघातर्फे नवी दिल्लीत २५ जुलै रोजी महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्यासह महासंघाचे राज्यस्तरावरील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते जंतरमंतर मैदानावर तीव्र आंदोलन केले जाणार आहे. राज्यातून हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed