• Sat. Sep 21st, 2024
मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; EWS घटकांच्या उत्पन्न निकषात मोठा बदल

मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक वृत्त आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणार्‍या घरांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात आर्थिक कमकुवत घटकांसाठी उत्पन्नाचा निकष आता ३ लाख रुपयांवरुन ६ लाख रुपये करण्यात आला असून, त्याचा फायदा लाखो नागरिकांना होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश मिळाले असून, केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश काढला आहे. या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणार्‍या एमएमआर क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रासाठी (एमएमआर) आर्थिक कमकुवत घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) उत्पन्नाचे निकष ३ लाखांऐवजी ६ लाख रुपये करण्यात यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकारने २१ जून २०२३ रोजी एक पत्र पाठवून केली होती.

नाशिक एसटी बस अपघात: बस ४०० फूट खोल दरीत कशी कोसळली?, बचावलेल्या कंडक्टरनं सांगितलं कारण, पाहा व्हिडिओ
राज्य सरकारने केंद्र सरकारला केलेल्या या विनंतीनंतर स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी संपर्क करुन त्यांना ही महत्त्वाची मागणी मान्य करण्याची विनंती केली होती.

मी मृत्यूची वाट पाहत होते; नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक खुलासा… ठाकरेंबाबत व्यक्त केली नाराजी
केंद्र सरकारने पत्र पाठवून राज्य सरकारला कळवले

केंद्र सरकारने आजच राज्य सरकारला पत्र पाठवून ही मागणी मान्य करण्यात आल्याचे कळविले आहे. राज्य सरकारची मागणी मान्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत.

हे काय सिगारेट पिणं झालं! विमानाचे टॉयलेट धुराने भरले, दरवाजा तोडून क्रूला केली मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed