• Sat. Sep 21st, 2024
उद्धव ठाकरेंची पहिल्यांदाच अजितदादांवर सडकून टीका, दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं!

नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजपशी संधान साधून थेट शिंदे-फडणवीस यांच्या सरकारलाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अजितदादांच्या बंडापासून राज्यातली सर्वच राजकीय गणिते बदलून गेली आहे. दरम्यान, अजितदादांच्या बंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच थेटपणे भाष्य केलंय. मोदींचं कौतुक करणाऱ्या दादांना ठाकरेंनी आरसा दाखवला.

उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले असता,दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी नागपुरात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच फडणवीसांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या दादांनाही सोडलं नाही. मोदींना विकासपुरुष म्हणणाऱ्या दादांचाही त्यांनी जोरदार समाचार घेतला.

Vedanta Foxconn : महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला पळवला, आता फॉक्सकॉनने वेदांताशी भागिदारीच मोडली
अजितदादांवर सडकून टीका

काल परवा पर्यंत जे आपल्यासोबत बसले होते (अजित पवार) ते आता पलीकडे गेलेत. आपल्याकडे असताना मोदींना खूप शिव्या देत होते. मात्र आता त्यांना साक्षात्कार झालाय की जेवढा विकास होतोय तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच होतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली देश आगेकूच करतोय. कालपर्यंत तर तुम्ही शिव्या देत होता, मग आज अचानक कसा काय साक्षात्कार झाला? तुमचा विकास होत असेल, पण देशाचा विकास कुठे होतोय? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केली.

फडणवीस हे नागपूरसाठी लागलेला कलंक : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजितदादांना सोबत घेतल्याप्रकरणी त्यांचीच एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकावली. ज्यात फडणवीस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही, सत्तेबाहेर राहावे लागले तरी चालेल पण आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असं सांगत होते. हा ऑडिओ ऐकवल्यानंतर फडणवीस हा नागपूरसाठी कलंक आहे, असा घणाघात ठाकरेंनी केला.

दुपारी जनता दरबार सुरु झाला, रात्री ११ पर्यंत रांगा, एवढी कामे रखडली होती?
काल ज्याला भ्रष्ट म्हणायचे, त्याच्यामागे सर्व तपास यंत्रणा लावायच्या. त्याच्या कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं, आणि तेच लोक तुमच्यासोबत आले की त्याला मंत्री करायचे. भाजपने आपले विचार पूर्णपणे संपवले आहेत. भाजप हिंदुत्वासोबत गद्दारी करतोय, असा घणाघाती हल्ला त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed