याबाबत सविस्तर वृत्त असे की चिपळूण मधील आठ मुले सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथे फिरण्यासाठी आली होती. त्यामध्ये इब्राहिम काजोरकर गोवळकोट,अब्रार हुसेन आंचरेकर गोवळकोट,फरहान हिदायत पिलपिले खाटीकअली चिपळूण, अली नियाज सनगे रा बेबल मोहल्ला, जहिद हनीफ खान रा कोंढे चिपळूण, आरमान अजीज खान रा भेंडी नाका चिपळूण, आतीक इरफान बेबल .. रा बेबल मोहल्ला,( बेपत्ता ), अब्दुल कादीर नोशाद लासने रा.जिव्हाळा सुपर बाझार यांचा समावेश होता.
शिरगाव येथील वझर याठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले यावेळी पावसाची एक मोठी सर आली आणि त्यातील सहा जण एका झोपडी खाली जाऊन थांबले तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली सदरचा डोह हा ३० ते ४० फूट खोल असून त्याच्या डोहात सापडल्यावर कोणीही वाचत नाही त्यामुळे सदरची दोन मुले त्यात बुडाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली तर चिपळूण डी वाय एस पी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पाण्याचा डोह हा खूप खोल आहे व पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने एनडीआरएफच्या पथक बोलावण्यात आलं आहे. करण्यात आली रात्री उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायत मार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली.
आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसणे दोघेही इयत्ता दहावीत शिक्षण घेत होते. सदरच्या घटनेची माहिती मिळताच चिपळूण मधील अनेक बांधवांनी शिरगाव पोलीस ठाण्यात भेट दिली अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत. चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश निगडे हे या सगळ्या प्रकरणी लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन विभागाच्या सगळ्या यंत्रणा येथे सज्ज ठेवण्यात आले आहेत. चिपळूण नगर परिषदेचे आपत्कालीन पथकही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आला होते, हे पथक घटनास्थळी सकाळी दाखल झाल आहे. या रेस्टॉरंट कडून या डोहात कॅमेरे सोडण्याचे काम चालू आहे. तसेच थोड्याच वेळात कोस्टगार्ड यांचीही टीम घटनास्थळी दाखल होणार आहे.