• Sat. Mar 14th, 2026
    Thane News: घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल, वाहनांना ‘या’ तारखेपर्यंत बंदी; कारण…

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली’ या मेट्रो चार प्रकल्पाचे काम शहरात प्रगतिपथावर आहे. या कामादरम्यान मानपाडा ते कापूरबावडी येथे गर्डर टाकण्याचे काम येत्या १८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री ११.५५ ते पहाटे ५ या वेळेत पाच तासांचा विशेष ब्लॉक या काळात घेतला जाणार आहे. या वेळेत अवजड वाहनांना या मार्गावर प्रवास करण्यास ठाणे वाहतूक शाखेने बंदी घातली आहे.

    अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागणार असल्याने या मार्गावर कोंडीची भीती वर्तवली जात आहे. घोडबंदर रोडवर जागोजागी मेट्रोच्या स्थानकांच्या उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. याच मार्गावरून दररोज हजारो अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे प्रवेशबंदीच्या काळात अवजड वाहने कापूरबावडी येथून भिवंडी, कशेळीमधून वळविण्यात आली आहेत.

    Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या; हवामान विभाग म्हणतं…
    तसेच मुंब्रा, कळवा येथून घोडबंदर रोडकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करत ही वाहने गॅमनमार्गे खारेगाव खाडी पुलाखालून खारेगाव टोलनाका माणकोली अंजूर फाटामार्गे मार्गस्थ केली जाणार आहेत.

    दरम्यान, तुंगारेश्वर अभयारण्याखालील जल बोगद्याचे महत्त्वाकांक्षी काम मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्ण केले आहे. सूर्या प्रादेशिक जलपुरवठा योजनेतील हा बोगदा असून त्यातील पाण्याचा लाभ मिरा-भाईंदर व वसई-विरार महापालिका क्षेत्राला होणार आहे.

    Mumbai News: पाणीच पाणी! महत्त्वाकांक्षी जलबोगद्याचं काम पूर्ण; या महापालिका क्षेत्राला होणार लाभ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed