• Sat. Sep 21st, 2024
बराच वेळ झालं तरी धीरज खाली का येत नाही, कुटुंबीय पाहायला गेले अन् तिथेच हंबरडा फोडला

जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात राहणाऱ्या तरूणाने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जावून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी समोर आली. धीरज प्रभाकर कोष्टी (वय-२०) रा. नशिराबाद ता. जि. जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. त्याचे आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. दरम्यान ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी खालच्या घरात धीरज याचे आई वडील हजर होते. याचदरम्यान धीरजने मृत्यूला कवटाळले, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शहरात धीरज कोष्टी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. तो सध्या बीसीएच्या वर्गात शिक्षण घेत होता. शनिवारी सायंकाळी धीरज हा आपल्या आई वडिलांसोबत खालच्या खोलीत बसला होता. त्यानंतर काही वेळाने तो राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावर गेला व याठिकाणी दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही धीरज खाली का येत नाही, हे पाहण्यासाठी धीरजचे कुटुंबीय वरऱ्या मजल्यावर गेले असता, धीरज हा गळफास घेतलेल्या दिसून आल्यावर आई वडिलांनी हंबरडा फोडला.

शिंदे गट उपाशी-दादांचे आमदार तुपाशी, सरकारला पाठिंबा दिल्याबरोबर मोठं गिफ्ट, नियोजनही झालं
स्थानिक नागरिक व शेजारी राहणाऱ्या मित्रांनी धाव घेवून धीरज याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी मयत घोषीत केले. धीरज याच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

सुप्रिया सुळेंकडून फ्रंटसीट, बसलेल्या नेत्याला उठवून पवारांकडून जागा, कोल्हेंचं महत्व वाढलं
या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत सैदाणे आणि शरीफ शेख करीत आहे. मयत तरूणाच्या पश्चात आई कांताबाई, वडील प्रभाकर कोष्ठी, तीन बहिणी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed