• Sat. Sep 21st, 2024

शासन आपल्या दारी कार्यक्रम, भाजप-शिवसेनेचे झेंडे लावले, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा गायब…

शासन आपल्या दारी कार्यक्रम, भाजप-शिवसेनेचे झेंडे लावले, पण राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा गायब…

धुळे : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहरात उद्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दोन्ही प्रमुख नेत्यांच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून शहराच्या विविध भागात शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. मात्र यातून राष्ट्रवादीचा झेंडा वगळण्यात आल्याने नागरिक आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.
पवारसाहेबांना की अजितदादांना पाठिंबा? आमदाराने टोकाची भूमिका जाहीर करत दोघांचंही टेन्शन वाढवलं
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा तसेच या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम पार पडत आहे. आणि उद्या धुळे शहरातील सूरत-नागपूर महामार्गावर असलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाच्या मैदानावर शासन आपल्या दारीचा उपक्रम संपन्न होणार आहे.शरद पवारांची साथ का सोडली? रोहित पवारांचं नाव घेत दिलीप वळसे पाटील यांचं मोठं वक्तव्य
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तसेच या कार्यक्रमाची तयारी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. ज्या मार्गावरून या प्रमुख नेत्यांचे आगमन होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर ज्या मार्गाने कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहे, त्या रस्ते शिवसेना आणि भाजपचे झेंडे लावून सजवण्यात आले आहे. मात्र विशेष म्हणजे यात भाजप आणि शिवसेना या दोनच पक्षांचे झेंडे स्थानिक नेत्यांनी लावले. यातून राष्ट्रवादीचा झेंडा वगळण्यात आला आहे.

कारखान्यात स्फोट झाला, मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली, पण हातात दिले अवघे एक लाख रुपये!

एकीकडे राज्याच्या पातळीवर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती झाली आहे. पण दुसरीकडे स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ही युती मान्य आहे की नाही? असा प्रश्न राष्ट्रवादीचा झेंडा वगळण्यात आल्याने उपस्थित केला जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर राष्ट्रवादीचा झेंडा वगळण्यात आल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed