• Mon. Nov 25th, 2024

    कोल्हापुरात ३ दिवासांपासून पावसाची बॅटिंग; पंचगंगाची पातळी वाढली, राधानगरी इतके टक्के भरले

    कोल्हापुरात ३ दिवासांपासून पावसाची बॅटिंग; पंचगंगाची पातळी वाढली, राधानगरी इतके टक्के भरले

    कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेले तीन दिवस जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. कोल्हापूर ग्रामीण भागात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला असून परिणामी पंचगंगा पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. यामुळे पंचगंगा नदी वरील ७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर धरण क्षेत्रात ही पाऊस जोरात सुरू असल्याने तळ गाठलेले राधानगरी धरण देखील ३६.९१ टक्के भरले आहे. आज दुपारपासून राधानगरी धणाच्या विद्युत विमोचनातून ७०० क्युसेक्स पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात आले आहे. यामुळे येत्या काळात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    सात बंधारे पाण्याखाली

    गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्र असलेल्या राधानगरी, गगनबावडा,शाहुवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असला तरी पावसाची बॅटिंग मात्र काय थांबलेली दिसत नाहीय. परिणामी कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हटल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी १९ फुट ७ इंचावर पोहोचली आहे.

    यामुळे जिल्ह्यातील एकूण ७ बंधारे पाण्याखाली गेले असून यामध्ये राजाराम बंधारा, शिंगणापूर बंधारा, रुई बंधारा , सुर्वे बंधारा , इचलकरंजी बंधारा, तेरवाड बंधारा, शिरोळ बंधारा यांचा समावेश आहे. दरम्यान हे सर्व बंधारे पाण्याखाली गेल्याने यावरून होणारी वाहतूक ब्यारिकेटिंग टाकून बंद करण्यात आली आहे.

    रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; AC डब्यातून प्रवास करणाऱ्यांना दिली इतकी मोठी सवलत
    राधानगरी धरणातून ७०० क्युसेक्स विसर्ग सुरु

    कोल्हापूर शहरात पाऊसाची लपाछपी सुरू असली तरी जिल्हयातील धरण क्षेत्र भागात मुसळधार पाऊस सुरू असून सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ४१७.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून राधानगरी तालुक्यात १५२.७ मिमी आणि आजरा तालुक्यात १६३.८ मिमी तर शाहूवाडी तालुक्यात १४९.१ मिमी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.

    यामुळे धरण क्षेत्रात देखील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून कोल्हापूर शहराचे तहान भागवणाऱ्या राधानगरी धरण ३६.६१ % भरला असून यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज दुपार पासून ८०० क्युसेक्स पाणी राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचन मधून भोगावती नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

    पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली, नागरिकांची जीव धोक्यात टाकून वाहतूक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *