• Sat. Sep 21st, 2024

खोक्यांवर बोलणारे ‘बोके’ आता गप्प का? दादा भुसेंनी राष्ट्रवादी नेत्यांचे नाव न घेता टोला लगावला

खोक्यांवर बोलणारे ‘बोके’ आता गप्प का? दादा भुसेंनी राष्ट्रवादी नेत्यांचे नाव न घेता टोला लगावला

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘जे लोक आम्हाला खोक्यांवर बोलत होते त्या ‘बोक्यां’नी आता बोलले पाहिजे. आमदार, खासदार सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात, त्यामागील अडचण पाहायला पाहिजे,’ असे सांगत जे आम्हाला बोलत होते त्यांनी आता आत्मचिंतन करायला हवे, असा टोला पालकमंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रवादीचे नेत्यांचे नाव न घेता लगावला.

राज्यातील राजकीय नाट्यानंतर दोन दिवसांपासून ‘भोंगा’ बंद होता. दोन दिवस त्यांना काहीच ‘स्कोप’ नव्हता, अशा शब्दांत भुसेंनी संजय राऊत यांच्यावर टीकास्र सोडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे नाराजी नसल्याचा दावाही भुसेंनी केला. नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार अर्थमंत्री असताना आमच्या आमदारांची त्यांच्यावर नाराजी होती, हे नाकारता येणार नाही. आमच्या नाराजीची दखल घेणे हे आमच्या प्रमुखांचे काम होते. पण, त्यावेळी ती घेतली गेली नाही. परंतु, आता कोणतीही नाराजी नसून, आमचे मुख्यमंत्री सक्षम असल्याचा दावाही भुसेंनी केला. मंत्रिपदांची ४३ ही संख्या निश्चित असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे भुसे यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी राज्याच्या वेगाने सुरू असलेल्या घोडदौडीवर विश्वास ठेवून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. रविवारचा शपथविधीचा सोहळा अचानक झाल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. राज्याच्या महायुतीत सहभागी होण्यासाठी अनेक पक्ष वाटेवर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुश्रीफ भाजपच्या वळचणीला तर गेले पण फडणवीसांचा शिष्य म्हणतो, २०२४ ला बरोबर कार्यक्रम करतो!
…तर राऊतांवर फौजदारी

राज्यातील राजकीय नाट्यानंतर तीन पक्ष एकत्र आल्याने काहीतरी अस्वस्थता निर्माण करावी, असे त्यांना वाटत आहे. गोरगरिबांचे कल्याण राऊतांना बघवत नसल्याची टीकाही भुसे यांनी केली. राऊत यांना मानहानीची नोटीस दिली आहे. त्यांनी माफी मागितली नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही भुसे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed