• Sat. Sep 21st, 2024

पुणे तेथे काय उणे! महावितरणाच्या तिजोरीत दरमहा कोटींची भर, पुणेकर ‘या’साठी ठरले अव्वल

पुणे तेथे काय उणे! महावितरणाच्या तिजोरीत दरमहा कोटींची भर, पुणेकर ‘या’साठी ठरले अव्वल

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘महावितरण’चे दरमहा सरासरी एक कोटी दहा लाख वीजग्राहक (६५ टक्के) पाच हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या आणि सुरक्षित भरणा करीत आहेत. त्यामध्ये पुणे परिमंडलातील २२ लाख ८३ हजार ग्राहकांनी सर्वाधिक १२०२ कोटी ७६ लाख रुपयांचा वीजबिलांचा भरणा करून राज्यात आघाडी घेतली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत ३५ टक्क्यांची भर पडली आहे.

घरबसल्या भरण्याची सोय

– बिलभरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेत वीजबिल भरण्याऐवजी ऑनलाइनद्वारे चोवीस तासांत कधीही वीजबिल भरण्याची सोय ‘महावितरण’ने उपलब्ध करून दिली आहे.
– ‘महावितरण’चे संकेतस्थळ किंवा मोबाइल अॅपवरून एकापेक्षा अधिक वीजजोडण्यांची बिले ऑनलाइन भरता येतात.
– याद्वारे बिलांचा तपशील आणि रक्कम भरल्याची पावती कम्प्युटर आणि मोबाइलमध्ये जतन करून ठेवता येते.
– त्याचा फायदा घेऊन ‘महावितरण’च्या उच्च दाब वर्गवारीतील सर्व ग्राहक दरमहा वीजबिले ऑनलाइन माध्यमातून भरत आहेत.

‘ई-बिलां’मध्ये पुणे अव्वल

‘महावितरण’च्या उच्चदाब आणि लघुदाब मिळून एक कोटी १० लाख ग्राहकांनी पाच हजार ७५० कोटी रुपयांचा ऑनलाइन भरणा केला आहे. त्यामध्ये पुणे परिमंडळातील वीजग्राहक आघाडीवर असून, त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील १९ लाख ७ हजार ग्राहकांनी ७२५.७९ कोटी रुपये आणि भांडूप परिमंडलातील १७ लाख ३१ हजार ग्राहकांनी १००५ कोटी ४१ लाख रुपयांच्या बिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.

बारामती परिमंडळातील १० लाख ६८ हजार ग्राहकांनी ५१९.३५ कोटी रुपये आणि नाशिक परिमंडलातील १० लाख ५३ हजार ग्राहकांनी ४६९.६४ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.
मुंबईकरांनी अदानीला गंडवलं! वर्षभरात तब्बल ३८ कोटींची वीजचोरी, तक्रारींचा आकडा वाचून धक्का बसेल
ऑनलाइन वीजबिलांत सवलत

‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत दरमहा वीजबिलामध्ये ०.२५ टक्के आणि वीजबिलाचा तातडीने भरणा केल्यास एक टक्का अशी एकूण १.२५ टक्के सवलत ग्राहकांना देण्यात येते. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिलाचा भरणा नि:शुल्क आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या ‘एका क्लिक’वर वीजबिल भरण्याची सुरक्षित आणि ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी वीजबिले ऑनलाइन माध्यमातून भरावीत, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed