• Sat. Sep 21st, 2024
आधी सुप्त संघर्ष-आता उघडपणे भिडणार, अजितदादा-जयंतराव एकमेकांना नडणार

जयंत पाटील…. अतिशय संयमी आणि अभ्यासू नेते… प्रखर वाचन, भाषेवर प्रभुत्व आणि शेलक्या शब्दांनी विरोधकांना गपगार करण्याचं कसब जयंतरावांकडे आहे. शरद पवार यांचे पुतणे असूनही अजितदादांवर जेवढा विश्वास नाही तेवढा विश्वास पवारांचा जयंतरावांवर असल्याचं अनेक वेळा दिसून आलं. आताही अजितदादांच्या बंडानंतर पवार एकटे पडलेले असताना जयंतरावच त्यांच्या सोबतीला खांद्याला खांदा लावून लढतायेत. अजित पवार विरुद्ध जयंत पाटील हा राष्ट्रवादीतला सुप्त संघर्ष दबक्या आवाजात चर्चेला जात होता. आता मात्र अगदी उघडपणे दोन्ही नेते त्वेषाने लढतील. अजितदादांचं बंड जयंतरावांसाठी कसं फायद्याचं आहे आणि या बंडाचा फायदा जयंतरावांना कसा होईल, वाचा…..

१९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. अनेक तरुण नेत्यांना सोबतीला घेऊन पवारांची पक्षाची वाटचाल सुरु केली. पवारांच्या बेरजेच्या राजकारणामुळे राष्ट्रवादी कायम सत्तेत राहिली. अजित पवार-आर आर पाटील-जयंत पाटील-दिलीप वळसे पाटील-सुनील तटकरे- छगन भुजबळ यांना संधी देत पवारांनी त्यांना मोठं केलं, त्यातले जयंतराव सोडता सगळे नेते अजितदादांच्या गटाकडे गेलेत. त्यामुळे जयंतरावांना काम करण्यासाठी मोठी स्पेस मिळालीये

  • राष्ट्रवादीत आतापर्यंत नेत्यांची मोठी फौज होती, अनेक जातींना राष्ट्रवादीत प्रतिनिधित्व होतं
  • पण बदलत्या राजकीय परिस्थितीत अजित पवारांचं बंड झालं, पवारांच्या अनेक निकटवर्तीय नेत्यांनी अजितदादांचा हात पकडला
  • आतापर्यंत काम करत असताना जयंतरावांना पक्षांतर्गत विरोधकांना सामोरं जावं लागलं
  • अजितदादा आणि जयंतराव यांच्यातला सुप्त संघर्ष गेली अनेक वर्ष सुरु होता
  • आता, अजितदादांच्या बंडानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झालीये, जयंतरावांसाठी ही मोठी संधी आहे

जयंतरराव तसे उत्तम संघटक आहेत. पूर्ण महाराष्ट्र त्यांना माहिती आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने चांदा ते बांदा ते फिरले आहेत. राष्ट्रवादीसाठी अनेक महत्त्वाचे कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांच्या स्वत:चं उत्तम संघटन त्यांनी केलं आहे. त्यांच्या हक्काच्या माणसांना त्यांनी पक्षात स्थान दिलं आहे.

  • शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतील
  • जयंतराव बोलत असताना शब्द मधुर वाटतात, पण शब्दांचे ओरखडे एवढे काटेरी असतात की विरोधक रक्तबंबाळ होतात
  • अजित पवार आणि त्यांच्या गटाची वैचारिक भूमिका आणि सत्तेसाठीची तळमळ यावरुन जयंतराव त्यांना घेरु शकतात
  • जयंतरावांना ऐकणारा आणि मानणारा वर्गही महाराष्ट्रात मोठा आहे
  • तरुण तडफदार खासदार अमोल कोल्हे यांना साथीला घेऊन जयंतराव शरद पवारांना मोठं बळ देऊ शकतात

एकाच नेत्याला विरोधीपक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही अजित पवार

जयंतरावांनी मागील ५ वर्षे प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीसाठी मोठं काम केलं. मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली. जयंतराव स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी म्हणून ओळखले जातात. शरद पवार-जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या फर्ड्या वक्तृत्वाने आणि उद्धव ठाकरे यांना मिळत असलेल्या सहानुभूतीने महाराष्ट्रात वारं फिरेल, असे राजकीय आडाखे अनेक जण बांधत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed