• Sat. Sep 21st, 2024

शरद पवारांपेक्षा दुप्पटीहून अधिक आहे अजित पवारांची ‘मनी पॉवर’, दादांची संपत्ती आहे इतके कोटी

शरद पवारांपेक्षा दुप्पटीहून अधिक आहे अजित पवारांची ‘मनी पॉवर’, दादांची संपत्ती आहे इतके कोटी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूंकप झाला आहे. यावेळी भूंकपाचे केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतण्या अजित पवार आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. इतक नाही तर अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आहे.

ज्या शरद पवारांनी अजित पवार यांना राजकारणाचे धडे शिवकले तेच आता काकांना सोडून बाहेर पडले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर १-२ नव्हे तर पाच वेळा राहिलेल्या अजित पवारांची प्रशासनावर प्रंचड पकड आहे. अजित पवार फक्त राजकारणात दादा नाही तर बिझनेसमध्ये देखील दादा आहेत. जाणून घेऊयात अजित पवार यांची संपत्ती आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल…

अजित पवार यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत अर्ज करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ७५.४८ कोटींची संपत्ती आहे. यातील २३.७५ कोटी ही जंगम मालमत्ता तर ५१.७५ कोटी इतकी स्थावर मालमत्ता आहे. अजित पवारांच्या कुटुंबाकडे ७५.४६ लाख रुपयांचे दागिणे आहेत. तर अजित पवार आणि कुटुंबाकडे मिळून २.६५ कोटींची शेत जमिन आहे. या शिवाय दादांकडे १६.४५ लाख रुपयांची बिगर शेतीची जमिन आहे. अजित दादांच्या नावावर २१.७८ कोटींची रहिवासी इमारत आहे. त्याच बरोबर १०.८५ कोटींची व्यवसाइक संपत्ती देखील आहे. २०१९मध्ये त्यांच्यावर ३.७३ कोटींचे कर्ज होते.

महाराष्ट्रातील जनतेला कळाले पाहिजे; अजित पवारांनी थेट घरातील गोष्टी सांगितल्या, ते फार हट्टी आहेत, कोणाचे…
अजित पवार यांचे काका राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ५० हून अधिक वर्षापासून देशाच्या राजकारणात आहेत. पण संपत्तीच्या बाबतीत अजित पवारांनी काकांना कधीच मागे टाकले आहे. शरद पवार हे राज्यसभेचे सभासद आहेत. २०२०मध्ये जेव्हा त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला होता तेव्हा दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती ३२.७३ कोटी इतकी होती. शरद पवारांच्या तुलनेत अजित पवार यांच्याकडे दुप्पटीहून अधिक संपत्ती आहे.

तो ठाण्याचा पठ्ठ्या, बोलून चांगल्याचं वाटोळं केले; अजित दादांनी आव्हाडांसह राऊतांना सोडले नाही
अजित पवार यांचा व्यवसाय…

ऑक्टोबर २०२१ मध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होती की अजित पवारांच्या ५७ कंपन्या आहेत आणि ते शेल कंपनी Yash V Jewels Limitedच्या माध्यमातून व्यवहार करतात. सेबीने २००९ साली या कंपनीला शेल कंपनी म्हणून जाहीर केले होते. अजित पवार यांच्यावर अनेक घोटाळ्यांचा आरोप देखील आहे. यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याचा समावेश आहे. या प्रकरणी अजित पवार आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित एका कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पण यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचे नाव नव्हते. तेव्हा ईडीने या दोघांविरुद्ध स्वतंत्र आरोप पत्र दाखल केले जाऊ शकते असे म्हटले होते.

जानेवारी २०२१ मध्ये ईडीने Jarandeshwar Co-operative Sugar Mill ची ६५ कोटींची संपत्ती जप्त केली होती. यात इमारत आणि यंत्रांचा समावेश होता. Sparkling Soil Pvt Ltd ही अजित पवारांशी संबंधित कंपनी आहे. ईडीचा आरोप आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ७०० कोटीचे कर्ज घेतले होते. तेव्हा या बँकेचे अध्यक्ष अजित पवार होते. आयकर विभागाने नोव्हेंबर २०२१ मध्ये अजित पवारांशी संबंधित १ हजार कोटींची संपत्ती जप्त केली होती. ही कारवाई बेनामी संपत्ती कायद्यानुसार केली होती. यात महाराष्ट्रातील २७ भूखंडांचा समावेश होता ज्याची किमत ५०० कोटी इतकी होती.

माझ्या आमदारांना बोलावतात, ते ऐकले नाही तर पत्नीला भावनिक बनवतात | अजित पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed