जामखेड येथील गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या 12 दिवसांपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर : जामखेड शहराला हादरवणाऱ्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे येथील ससून रुग्णालयात गेल्या बारा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने सोमवारी सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे जामखेड परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सात पैकी चार गोळ्या सागर मोहळकर याच्या शरीरात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ४ मार्च रोजी रात्री जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात सागर मोहळकर याच्यावर गोळीबार झाला होता. या हल्ल्यात आरोपी अभिमन्यू पोते याने तब्बल 7 राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली होती.
सागर मोहळकर याच्यावर कर्जतमध्ये गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी सागर मोहळकरला रुग्णालयात दाखल केलं होतं. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा केला होता. त्यानुसार पुढील तपासाला सुरुवात केली होती.
अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. सात पैकी चार गोळ्या सागर मोहळकर याच्या शरीरात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. गोळीबारानंतर जखमी अवस्थेत मोहळकरला तातडीने उपचारासाठी प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. गेल्या बारा दिवसांपासून डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. मात्र जखमा गंभीर असल्याने अखेर सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून आरोपीला अटक
दरम्यान, या गोळीबार प्रकरणामुळे जामखेड शहरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू करत आरोपी अभिमन्यू पोते याला स्थानिक शाखेने अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सागर मोहळकरच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा