• Sat. Sep 21st, 2024
पावसाळी पर्यटनाचा बळी! तलावात पोहण्यासाठी मारलेली उडी ठरली अखेरची, तरुणाचा दुर्दैवी अंत

रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा दुर्दैवाने पहिला बळी गेला आहे. रत्नागिरी सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटात पर्यटनासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटात शिंदी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
Nagpur Crime: बापरे! चालत्या बसमध्ये खिडकीतून महिलेवर चाकू फेकला, नागपूरच्या रस्त्यावर थरार
पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या ओमकार महेंद्र दहिवलकर राहणार खोपी फाटा खेड असे या मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली असून कोकणातील पावसाचा हा पहिला बळी ठरला आहे. ओमकार हा रविवारी सुट्टीनिमित्त पावसाळी पर्यटनासाठी आपल्या मित्रांसमवेत रघुवीर घाट येथे गेला होता. शिंदी गाव नजीकच्या एका तलावात त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने तलावात उडी घेतली. मात्र तो बराच वेळ झाला तरी परत आला नाही.

केरळच्या मलप्पुरममध्ये डबल डेकर बोट उलटली; 21 पर्यटकांचा बुडून मृत्यू, 10 जण बचावले

ही बाब पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरा बचाव कार्य सुरू होते. रात्री उशिरा त्याचा मृतदेह त्या तलावातून मिळाला आहे. त्यानंतर मृतदेह खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान या तलावात यापूर्वी अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे सद्यस्थितीत रघुवीर घाट पर्यटकांना भुरळ घालत असला तरी हा तलाव धोकादायक ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed