• Sat. Sep 21st, 2024

सोडून गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर सडकून टीका, पवारांविषयी बोलताना आव्हाडांचा कंठ दाटला

सोडून गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर सडकून टीका, पवारांविषयी बोलताना आव्हाडांचा कंठ दाटला

मुंबई: राष्ट्रवादीचे विरोधपक्ष नेते अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादीचे विरोधीपक्षनेते आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आव्हाडांनी बंदखोरांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, शरद पवारांविषयी बोलताना मात्र ते भावूक झाले.

“ज्या माणसाने तुम्हाला मोकळं मैदान दिलं, त्या माणसाच्या उतारवयात त्यांना हे दिवस दाखवले…? जे मंत्री राहिले त्यांनी आमदार तरी निवडून आणले का? साहेबांनीच भाषणं करायची. त्यांनीच जनतेत फिरायचं, आमदार निवडून आणायचे आणि तुम्हाला मंत्रालयात बसवायचं. असं सगळं केल्यानंतर उतारवयात त्यांच्या वाट्याला काय तर हे असं दिवस”, असं बोलताना जितेंद्र आव्हाडांचा कंठ दाटून आला.

एकनाथ शिंदेंसारखाच अजितदादांनी पक्षावर दावा सांगितला, शरद पवारांनी तीन शब्दात निकाल लावला!
मेलो तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही – आव्हाड

“ज्या बापाने मुलांना सगळं दिलं, काही मागायची गरज पडली नाही, फोनवर मंत्री केलं, पण त्याच बापाच्या उतारवयात पोरांनी असा निर्णय घेतला. आज महाराष्ट्राच्या घराघरात दु:खाची छटा असेल. मला अजितदादांकडून कुणीही सोबत येण्याविषयी विचारलं नाही. ते बरंच झालं. कारण मी मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही, हे मी किती वेळा सांगून झालंय.”

काळजी नको, ठाकरेंच्या साथीने पुन्हा नव्याने सर्व उभं करु, शरद पवारांचा राऊतांना फोन
“एखाद्या पोराने म्हाताऱ्या बापाला घराबाहेर काढावं, तशी आता परिस्थिती झालीये. माणुसकी जिवंत असेल तर हृदयाला चिमटा बसत असेल ना की हे आपण काय करतोय… आपण इतके निष्ठूर… इतके संवेदना विसरलेलो झालो आहोत की आपल्याला काहीच वाटत नाही? दु:खाची एक छटाही तुमच्या तोंडावर दिसत नाही. सहा तारखेला बैठक होती ना… त्याच्याआधीच एवढी घाई…? सहा तारखेच्या बैठकीत सांगितलं असतं साहेब आम्ही असं असं करणार आहे. त्यांनी सांगितलं असतं, करा बाबा-माझं काही म्हणणं नाही. पण बैठक ठेवायला सांगून त्यांनीच असा निर्णय घेतला- यावर आता काय बोलायचं…?”, असंही आव्हाड म्हणाले.

हा असला प्रकार मला नवीन नाही, शरद पवारांनी मांडली कणखर भूमिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed