• Sat. Sep 21st, 2024

अपघातानंतर मृतदेहांची अवस्था पाहावत नव्हती; गावातील महिलांनी नव्याकोऱ्या साड्या आणल्या आणि…

अपघातानंतर मृतदेहांची अवस्था पाहावत नव्हती; गावातील महिलांनी नव्याकोऱ्या साड्या आणल्या आणि…

बुलढाणा : नागपूर येथून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे शनिवारी पहाटे अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतल्यामुळे बसमधील २५ प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. बसला लागलेली आग इतकी भीषण होती की, प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. अपघातग्रस्त बस ही ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’ या खासगी कंपनीची होती. ही बस शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता नागपूर येथून प्रवासी घेऊन पुण्याकडे रवाना झाली. मार्गात वर्धा आणि यवतमाळ येथूनही काही प्रवासी गाडीत बसले. शुक्रवारी रात्री कारंजा येथे जेवणासाठी बस थांबविण्यात आली. जेवण झाल्यानंतर समृद्धी महामार्गाने बसचा पुढील प्रवास सुरू झाला. बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटाजवळून जात असताना, ही बस खांबावर आदळून उलटली. या धक्क्याने गाडीच्या डिझेल टँकचा स्फोट झाला आणि संपूर्ण बसला आग लागली. रात्रीची वेळ असल्याने बहुतांश प्रवासी झोपेत होते. त्यांना काही कळायच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. बसच्या काचा फोडून बाहेर पडण्यासाठी अनेकांनी धडपड केली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. या अग्नितांडवात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपळखुटा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. सीटवर बसलेल्या अवस्थेतच प्रवाशांचा कोळसा झाल्याचं पाहून गावकरीही हादरून गेले. हे विदारक दृश्य पाहून गावातील महिलांनी नव्याकोऱ्या साड्या आणल्या आणि सदर मृतदेह झाकले.

Mumbai News: अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा मुंबईत मृत्यू, इमारतीच्या २२व्या मजल्यावरून खाली कोसळला

ट्रॅव्हल्सच्या अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या संदीप मेहेत्रे या समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने आँखो देखी सांगितली आहे. ‘शुक्रवारी रात्री आम्ही छत्रपती संभाजीनगरहून परतत होतो. मध्यरात्री २ वाजता आम्हाला खासगी बसचा अपघात झाल्याचं कळलं. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोलीस आणि बचाव पथक तिथे पोहोचलेले होतं. तसंच पिंपळखुटा येथील ग्रामस्थही मदतकार्यासाठी आले होते. या गावातील महिलांना साड्या आणत हे मृतदेह झाकले,’ अशी माहिती मेहेत्रे यांनी दिली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांमध्ये वर्धा जिल्ह्यातील १४, नागपूर शहरातील ४, पुणे येथील ३, तर यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. या अपघातात अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून त्यामुळे राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांची नावे

तेजस पोफळे (वय २३, रा. वर्धा), तुषार उर्फ करण बुधबावरे (वय ३४, रा. झडशी ता. सेलू जि. वर्धा), वृषाली वनकर (वय ४०, रा. वर्धा), ओवी वनकर (वय २, रा. वर्धा), शोभा वनकर (वय ६६, रा. वर्धा) ईशांत गुप्ता (वय २०, रा. नागपूर), सृजल सोनोने (वय २२, रा. यवतमाळ), तनिशा तायडे (रा. वर्धा), तेजू राऊत (रा. अल्लीपूर, वर्धा), कैलास गंगावणे (रा. पुणे), कांचन गंगावणे (रा. पुणे), सई गंगावणे (रा. पुणे), संजीवनी शंकरराव गोठे (वय २४, रा. वर्धा), सुशील दिनकर खेलकर (वय २३, रा. पवनार जि. वर्धा), झोया उर्फ गुडीया शेख (वय २९, रा. नागपूर), रिया सोनपुरे (वय २५, रा. नागपूर), कौस्तुभ काळे (रा. नागपूर), राजश्री गांढोळे (वय ५७, रा. वर्धा), मनीषा बहाळे (वय २१, रा. कारंजा जि. वाशीम), संजय बहाळे (वय ४७, रा. कारंजा जि. वाशीम), राधिका खडसे (रा. वर्धा), श्रेया वंजारी (वय २३, रा. वर्धा), प्रथमेश खोडे (वय २५, रा. वर्धा), अवंतिका पोहनकर (वय २५, रा. वर्धा), निखिल पाते (वय २३, रा. यवतमाळ).

जखमींची नावे

वाहनचालक शेख दानिश शेख इस्माईल (रा. दारव्हा, जि. यवतमाळ), वाहक संदीप मारुती राठोड (रा. तिवसा जि. अमरावती), योगेश रामराव गवई (रा. भालेगाव, ता. मेहकर, ह.मु. छत्रपती संभाजीनगर), साईनाथ धरमसिंग पवार (रा. माहूर, जि. नांदेड), आयुष गाडगे, शशिकांत रामकृष्ण गजभिये (रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ), पंकज रमेशचंद्र (रा. कांगडा, हिमाचल प्रदेश).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed