समोरासमोर गाड्या धडकल्याने मोठा आवाज झाल्याने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. यात विनायक क्षिरसागर हा कार मध्येच अडकून राहीला होता. अपघाताची माहिती कळताच वणी पोलीस आणि वणीतील काही लोकांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघातातील नऊ गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आले आहे. यात जतिन अनिल पावडे. आणि रविंद्र मोतीचंद चव्हाण यांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले होते. त्यानां जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले .
या अपघातात क्रुझर गाडीतील नऊ जण जखमी झाले आहेत. क्रुझर मधील प्रवासी कमळी युवराज गांगोडे (वय ४०), कल्पना सुभाष सोळसे (वय १९), तुळशीराम गोविंदा भोये (वय २८), ललीता युवराज कडाळे (वय ३०), रोहिदास पांडुरंग कडाळे, (वय २५), योगेश मधुकर सोळसे (वय १५), सुभाष काशिनाथ सोळसे (वय १५), देवेंद्र सुभाष सोळसेक (वय ४७), नेहल सुभाष सोळसे (वय ७) हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना वणी ग्रामिण रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर खाजगी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी ग्रामिण रुग्णालयात उपस्थित असलेल्या एकमेव वैद्यकिय अधिकारी डॉ. विशाल महाले यांच्या मदतीला नेहमी प्रमाणे पांडाणे आरोग्य केंद्राचे डॉ. प्रकाश देशमुख, वणी डॉक्टर असोसिएशनचे डॉ. अनिल पवार, डॉ. अनिल शेळके, डॉ. आहेर, डॉ. योगेश पाटील, डॉ. डॉ. वैभव मोहीते आदी खाजगी डॉक्टर धावून येत त्यांनी जखमींवर उपचार केले.