अपघातातील सर्व भाविक हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील अणूर गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथील डॉ. अंजुम सय्यद, डॉ. घंटे आदी डॉक्टरांची टीम जखमींवर तातडीने उपचार करत आहेत.
दर्शन घेऊन परतताना झाला अपघात
अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अणूर (ता आळदं,जि गुलबर्गा) येथील महिला भाविक आले होते. स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शन घेउन परतत असताना क्रूझरची आणि सिमेंट ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. क्रूझरमधील महिला आणि लहान मुलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तीन ते चार जण गंभीर जखमी आहेत. त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पंचनामा करत आहेत.
मृतांची नावे
१. संगीता मदन माने (वय ३५ रा. बेडगे ता. उमरगा)
२. सुंदराबाई भारतासिंग राजपूत (वय ५५ रा अन्नुर ता.आळंद, जि. गुलबर्गा)
३. ललीता महादेव बग्गे (वय ५० रा. अन्नुरता आळंद, जि. गुलबर्गा)
४. साईनाथ गोविंद पुजारी (वय १० रा. अन्नुर, ता आळंद, जि. गुलबर्गा)
५. रोहिणी गोपाळ पुजारी (वय ४० रा. अन्नुर ता. आळंद जि. गुलबर्गा) असे पाच मृताची नावे कळली आहेत. अजून एका मृत महिलेची ओळख पटली नव्हती.
जखमींचे नावे
सुमित पुजारी, रेखा गोविंद पुजारी (वय ४० वर्ष), गोपाळ चंद्रकांत पुजारी (वय ४५), विठ्ठल हनुमंत ननावरे (वय ३८ वर्ष), अजित अशोक कुंदले (वय ३० वर्ष), नागेश अशोक कुंदले, कल्पना अशोक कुंदले (४० वर्ष), अशोक कुंदले (४५ वर्ष), कोमल शामंडे (वय ५० वर्ष), सुनील पांचाळ (५० वर्ष ) अशी जखमींची नावे आहेत. अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.