• Mon. Nov 25th, 2024
    जवान राहुल माळी अनंतात विलीन; चार वर्षाच्या चिमुकल्याने दिला पित्याला मुखाग्नी, परिसर हळहळला

    जळगाव: भारत – बांगलादेश सीमेजवळ पश्चित बंगाल येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना भडगाव तालुक्यातील गुढे येथील सैन्य दलातील जवान राहुल श्रावण माळी (३४) या जवानाला वीरमरण आले आहे. या जवानावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळालं.
    Maharashtra News : महाराष्ट्राच्या जवानाला कर्तव्य बजावताना वीरमरण, महिन्यापूर्वीच कुटुंबाची अखेरची भेट; पत्नी,२ मुलं…
    भडगाव तालुक्यातील गुढे येथील राहुल श्रावण माळी हे भारतीय सैन्य दलात होते. राहुल माळी हे १४ वर्षापासून सैन्य दलात सेवा बजावत होते. ते कुंटुबासह आर्मी सेंटरमध्ये वास्तव्यास होते. सध्या ते भारत – बांगलादेश सीमेजवळ पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे नायक पदावर सेवा बजावत होते. नेहमीप्रमाणे कंचनपुरा येथे सेवा बजावत असताना मंगळवारी रात्री राहुल माळी यांना मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे त्यांच्या गुढे या मूळ गावी दाखल झाले. या ठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राहुल माळी यांच्या पत्नीसह कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला.

    कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश.. शहीद लीलाधर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    चार वर्षाच्या चिमुकला शिव याच्या चिमुकल्या हाताने पित्याला मुखाग्नी देण्यात आला. राहुल माळी यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जिल्हाभरातून जनसमुदाय उसळला होता. हवेत बंदुकीच्या फैरी झाडत शासकीय इतमामात माळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रचंड संख्येने जमलेल्या नागरिकांनी साश्रू नयनांनी जवान राहुल माळी यांना शेवटचा निरोप दिला. भारत माता की जय… अमर रहे अमर रहे जवान राहुल माळी अमर रहे. अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. राहुल माळी यांच्या पश्चात पत्नी ज्योती, शिव (४) आणि शंभु (दीड वर्ष) अशी लहान चिमुकले मुले, तसेच वडील, आईसह दोन मोठे भाऊ वहिनी, पुतणे असा परिवार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed