• Sat. Sep 21st, 2024
पावसाळ्यात साथीचे रोग डोकं वर काढतायत, ठाण्यात पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी, रहिवाशी चिंतेत

म. टा. वृत्तसेवा, ठाणे : पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यामुळे जलजन्य साथीचे आजार तत्काळ पसरत असल्याने पाणी स्वच्छ व उकळून पिण्याचे आवाहन केले जात असले तरी ठाणे शहरात वितरीत होणाऱ्या पाण्याला दर्प आल्याने ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुंबई महापालिकेडून ठाणे शहरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याला विशिष्ट वास येत असल्याने कोपरी, नौपाडा वागळे इस्टेट भागातील रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्ह्यात वरुणराजाने जोर धरला असून धरण क्षेत्रात पावसाने दमदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाणीकपातीचे प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबई, ठाणे महापालिका क्षेत्रांत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाऊस चांगला बरसत आहे.

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा; काळे दाम्पत्य मानाचे वारकरी
पिण्याच्या पाण्यामुळे जलजन्य आजारांचा लवकर फैलाव होतो. त्यामुळे पाणी पिताना खबरदारी घेण्याची सूचना ठाणे महापालिका करते. पावसाळ्यात गढूळ आणि दूषित पाणी येण्याची शक्यता असते. मात्र बुधवारी सकाळी कोपरी नौपाडा वागळे इस्टेट परिसरात पाण्याला दर्प येत होता. अशा पाण्यामुळे कोणती रोगराई पसरणार तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जाते आहे.

या बाबत ठाणे महापालिका पाणी विभागाशी संपर्क साधला असता, ठाणे शहरात पाणी पुरवठा करणाऱ्यांपैकी मुंबई महापालिका जलवाहिनी मधून वितरित झालेल्या पाण्याला वास येत होता. त्यामुळे कोपरी, नौपाडा आणि वागळे इस्टेट भागांतून या संदर्भात तक्रारी आल्या आहेत. हा वास कुठून आणि कसा आला, याबाबत चौकशी केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून गाळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

मुंबईत मुलुंड ते घाटकोपर परिसरात पाणी दुर्गंधीचा कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. ठाणे शहरात मुंबई महापालिकेकडून वितरित होणाऱ्या पाण्याचा वास आला असल्यास पाणी वितरणाची शुद्धता तपासली जाईल, असे मुंबई महापालिकेतील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Mumbai Rains: पावसाने दाणादाण, मुंबई तुंबली; कुठे घरांची पडझड तर कुठे वाहनांचे नुकसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed