• Sat. Sep 21st, 2024
Mumbai Rains: पावसाने दाणादाण, मुंबई तुंबली; कुठे घरांची पडझड तर कुठे वाहनांचे नुकसान

म. टा. प्रतिनिधी, मुंबई/ठाणे : मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर पालघर आदी भागांत बुधवारी पावसाने दिवसभर दाणादाण उडवल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसामुळे पाणी साचू नये, यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या जय्यत तयारीचा दावा बुधवारीही फोल ठरला. सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी तुंबले होते. काही भागांतील रस्तेही जलमय झाले. तर नाले, गटारेही तुंबली. मुंबईतील शहरी भागांपेक्षा उपनगरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. मुंबईत सहा ठिकाणी घरांचा काही भाग पडण्याच्या घटना घडल्या.

ठाणे जिल्ह्यातही पावसामुळे या भागातील अनेक रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते व महामार्गांवरील वाहतूक मंदावली होती. यासोबतच शहरात विविध ठिकाणी झालेल्या पडझडीत वाहनांचे व घरांचे मोठे नुकसान झाले. विविध २० ठिकाणी पाणी तुंबले होते. मुंब्रा बायपासवर सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात पाणी साचल्याने पोलीस प्रशासनाची त्रेधातिरपीट उडाली. तर पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीला पूर आला असून, मासवण येथे असलेला जुना पूल. सायंकाळी पाण्याखाली गेला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! FRPमध्ये केंद्र सरकारकडून मोठी वाढ, राजू शेट्टींचा संताप
मुंबईत दहा टक्के पाणीकपात

मुंबईत पावसाचे उशिराने झालेले आगमन आणि धरणक्षेत्राकडे पावसाने फिरवलेली पाठ यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही. परिणामी, शनिवार, १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेकडून ठाणे, भिवंडी-निजामपूर महापालिका आणि इतर गावांना करण्यात येणाऱ्या पुरवठ्यातही ही १० टक्के कपात लागू राहील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Aaditya Thackeray: शिवसेना भवनाकडे येताना आदित्य ठाकरेंच्या गाडीला दुचाकीची धडक, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed