• Sat. Sep 21st, 2024

पवारांची ‘ती’ खेळी म्हणजे मुत्सद्देगिरी, फडणवीसांच्या वक्तव्याला आठवलेंनी छेद दिल्याने चर्चा

पवारांची ‘ती’ खेळी म्हणजे मुत्सद्देगिरी, फडणवीसांच्या वक्तव्याला आठवलेंनी छेद दिल्याने चर्चा

अहमदनगर : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या काळात ४० आमदार घेऊन बाहेर पडण्याची व पुलोद सरकार स्थापन करण्याची ज्येष्ठ नेते शरद पवार यांची खेळी ही मुत्सद्देगिरी होती, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी येथे मांडली. या भाष्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या ‘त्या’ खेळीस बेईमानी ठरवण्याच्या सूचक वक्तव्याला आठवलेंनी छेद दिल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

शिर्डी येथील कार्यक्रमानंतर राशिनच्या कार्यक्रमास जात असताना नगरच्या शासकीय विश्रामगृहावर आठवल्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहराध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विजय भांबळ आणि उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याला राष्ट्रवादीने गद्दारी संबोधले होते. त्यावर बोलताना फडणवीस यांनी पवारांनी वसंतदादांच्या काळात ४० आमदार घेऊन बाहेर पडणे ही बेईमानी नव्हती का ?असा सवाल केला होता. या पार्श्वभूमीवर भाष्य करताना आठवले म्हणाले, पवारांची ती खेळी मुत्सद्देगिरी होती, त्यांनी पुलोद सरकार बनवले होते. त्यात जनसंघाचे हशू अडवाणी आणि उत्तमराव पाटील होते असे स्पष्ट करून एक प्रकारे फडणवीस यांच्या भूमिकेला खोडून काढले.
मुख्यमंत्र्यांना दिलेले ते पत्र बाहेर कसे पडले? विखे पाटील समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता
यावेळी बोलताना आठवले यांनी पवारांना सल्लाही दिला की, त्यांनी राहुल, सोनिया, नितीश कुमार यांच्या नादाला लागू नये. पवार हे राजकीय विचारवंत आहेत. मोदींचे काम पाहून त्यांनी खरंतर मोदींची स्तुती करायला हवी. मात्र, इतरांचे ऐकून ते मोदींवर टीका करतात, असा दावाही आठवले यांनी केला.
सौंदर्यानं तमाशा रसिकांना घायाळ केलं, टाळ्या अन् शिट्या, आता लावणीसम्राज्ञीवर भीक मागण्याची वेळ
देशात औरंगजेबाचा उदो उदो करणे योग्य नाही. प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला दिलेली भेट दलित समाजाला आवडलेली नाही. औरंगजेब हा भारतातील नाही. भारतातील मुस्लिम हे आधी हिंदू होते, त्या आधीचे बौद्ध होते व त्या आधी ते वैदिक होते. त्यामुळे ओवेसींनी जाणूनबुजून हिंदू विरोध करू नये. औरंगजेब येथील नाही, त्याची कौम येथे नाही, त्यामुळे त्याचा उदो उदो नको व त्यामुळे दोन्ही समाजांने एकमेकाला समजून घेतले पाहिजे तसेच नथूराम गोडसेचे फोटोही कोणी दाखवू नये. वादाचे मुद्दे होतील असे दोन्ही बाजूने कुणी काही करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पंकजा मुंडे हेवा वाटावा अशाच नेत्या, पण कितीही ऑफर आल्या तरी भाजप सोडणार नाहीत; सुजय विखेंचा विश्वास

मुख्यमंत्री व्हायची माझी इच्छा असली तरी ३०-४० आमदार ज्याचे असतील, तो मुख्यमंत्री होऊ शकतो. मला विनाकारण बॅनरचा मुख्यमंत्री व्हायचे नाही तर खरा खरा मुख्यमंत्री व्हायचे आहे, अशी मिश्किल टिपणी करून आठवले म्हणाले , राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेते शरद भुजबळ ओबीसी प्रदेशाध्यक्ष होत नसल्याने नाराज असतील तर त्यांनी आमच्या रिपब्लिकन पक्षात यावे. अन्याय सहन करण्याची भूमिका भुजबळ यांची नाही, असे भाष्यही आठवले यांनी केले.

पंकजा मुंडे भाजपवर नाराज नाहीत, २०२४ मध्ये त्या धनंजय मुंडे यांना नक्की हरवतील. तेलंगणाचे केसीआर यांचा नवीन पक्ष फक्त कट आउट लावण्याचे काम करतो, काही जणांना त्यांनी घेतले असले तरी आम्हाला त्याची भीती नाही. पंकजा त्यांच्याकडे जाणार नाही. केसीआर हा भाजपची बी टीम नाही, ते भाजपच्या विरोधात आहेत, असे दावेही आठवले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed