• Mon. Nov 25th, 2024
    केसीआर यांच्या सोलापूर दौऱ्यात एक गोष्ट नजरेत भरली, गाड्यांवर एकच नंबरप्लेट, जाणून घ्या कारण

    Edited by Vrushal Karmarkar | | Updated: 27 Jun 2023, 6:09 pm

    तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाड्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा नंबर सारखाच असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी असे का केले असे विचारले असता कार्यकर्त्यांनी दिलेले उत्तर तुम्हीच वाचा…

     

    केसीआर यांच्या गाड्या

    हायलाइट्स:

    • मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा सौलापूर दौरा चर्चेत
    • ताफ्यातील गाड्या ठरल्या चर्चेचा विषय
    • सर्व गाड्यांचा नंबर सारखाच
    सोलापूर: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या ६०० वाहनांचा ताफा दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आला होता. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस बीआरएस नेत्यांनी सोलापुरातील विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. ६०० गाड्यांच्या ताफा सोलापुरात पहिल्यांदाच आला आहे.
    आंध्राची विभागणी करायला भाग पाडलं; नंतर स्वतः मुख्यमंत्री, केसीआर आता मोदींना नडणार?
    आलिशान गाड्या सोलापुरातील रस्त्यावरून जाताना सोलापूरकर तोंडात बोट घालून पाहत होते. आलिशान गाड्यांच्या नंबर प्लेटकडे काही मोजक्या जणांचे लक्ष गेले. सर्व वाहनांचे एकच नंबर प्लेट पहायला मिळाले. ते म्हणजे TS-०९-६६६६. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व वाहनांचे नंबर प्लेट एकच असल्याची माहिती ताफ्यातील वाहनचालकांनी दिली. के. चंद्रशेखर राव यांच्या वाहनांचा ताफा सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये सोमवारी रात्री मुक्कामास होता. हॉटेल परिसरात आलिशान गाड्यांचा थांबलेला ताफा होता.

    भालके आमदारच काय तर मंत्री होतील, केसीआर यांचं पंढरपूरात विधान

    या वाहनांकडे बारकाईने लक्ष दिले असता सर्व वाहनांवर एकाच क्रमांकाची नंबर प्लेट पहायला मिळाली. ताफ्यातील वाहन चालकांना याबाबत अधिक माहिती विचारली असता, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व वाहनांना एकच क्रमांक आहे. मुख्यमंत्री कोणत्या वाहनांत बसलेत हे अधिक लोकांना कळू नये म्हणून अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वाहनचालकांनी दिली.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *