छत्रपती संभाजीनगर : विक्रीकर आयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीड जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक, मनपा प्रशासक आयुक्त आणि आता मराठवाड्याचे विभागीय आयुक्त असलेले सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शासनाकडे स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. दबंग अधिकाऱ्याच्या स्वेच्छा निवृत्तीने मराठवाड्यात मोठी चर्चा रंगली आहे.महाराष्ट्रात दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेले सुनील केंद्रेकर हे १९ फेब्रुवारी २०१९ रोजी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त म्हणून रुजू झाले. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त असताना केंद्रेकर यांनी अनेक महत्त्वाची कामे केली. नुकतंच काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दर्जाबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिक्षकांचा वर्ग भरवल्यामुळे ते चर्चेत आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, असा उद्देश यामागे केंद्रेकर यांचा होता.
महिलाच नाही तर पुरुषही होत आहेत बेपत्ता, महाराष्ट्रातील या शहरातून ५ महिन्यांत २७९ पुरुष गायब
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? आत्महत्या थांबवण्यासाठी काय केले पाहिजे? या संदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात सर्वे केला होता. या सर्वेनुसार सरकारकडे पेरणीपूर्वी प्रत्येकाला दहा हजार रुपये मदत करण्याची शिफारस त्यांनी केली होती. यामुळेही सुनील केंद्रेकर महाराष्ट्रभर चर्चेत आले होते.
समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; तुम्ही ही चूक कराल तर भरावा लागेल दंड
बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना राजकीय दबावातून त्यांची बदली करण्यात आली. यावेळी बीड जिल्ह्यामध्ये बंद पाळण्यात आला होता. यामुळे दबंग अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची ओळख आहे.वारकऱ्यांसाठी १३४२ महिलांनी तयार केले ७२ हजार ७४४ लाडू
सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केल्यानंतर शासनाने तो मंजूर केला आहे. विभागीय आयुक्तांच्या अखत्यरितील अनेक कामं प्रलंबित आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर मराठवाड्यातील विकास कामांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये अर्ज करण्यात आला आहे. यामध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना २०२४ पर्यंत स्वेच्छा निवृत्ती देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.