दर्शना सोबत राहुलला लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तिने त्याला नकार देखील दिला होता. १२ जूनला दोघेही राजगड येथे ट्रेकिंगसाठी दुचाकीवरून आले होते. असे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. मात्र, काही वेळानंतर राहुल हा एकटाच वरून खाली येताना पहायला मिळत आहे. तिचे लग्न ठरले होते की नव्हते, तसेच सीसीटीव्ही बाबत देखील पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याने खून कसा केला याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी कडून सांगण्यात आले.
दर्शना आणि राहूल एकमेकांना लहान पणापासून ओळखत होते. दोघेही पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होते. दर्शना हुशार असल्याने तिने mpsc परीक्षा उत्तीर्ण होऊन ती पहिल्याच प्रयत्नात वनाधिकरी म्हणून काही दिवसात कामावृ रुजू होणार होती. मात्र राहुल याला परीक्षेत अपयश येत होते. तो डिलिव्हरी बॉय चे पार्ट टाईम काम करायचा आणि इतर वेळी mpsc चा अभ्यास करत होता.
दर्शनाची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी राहुल हांडोरेने काय-काय केलं?
दर्शनाची हत्या केल्यानंतर राहुल फरार झाला होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने पुण्यातून पळ काढला, तो वेगवेगळ्या शहरात फिरत राहिला. यादरम्यान त्याने रेल्वेने प्रवास केला. पुण्यातून तो सर्वात आधी सांगलीत गेला. त्यानंतर तेथून त्याने गोवा गाठलं. त्यानंतर तो थेट चंदीगडला पोहोचला. त्यानंतर तो पश्चिम बंगालमधील हावडा येथे गेला.
यावेळी राहुलने पोलिसांपासून कसं लपायचं याची सारी तयारी केली होती. त्याने त्याचा मोबाईल पूर्णवेळ बंद ठेवला होता, जेणेकरुन पोलिसांना त्याच्या लोकेशनची माहिती मिळू नये. जेव्हा गरज असेल तेव्हा तो नातेवाईक-मित्रांना फोन करायचा. पण, यावेळी त्याने खबरदारी घेतली. त्याने आपल्या फोनवरुन एकही फोन केला नाही. तर, प्रवासात सहप्रवाशांकडून फोन घेऊन त्याने संपर्क साधला. यादरम्यान, त्याने पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून फोन केले. तो प्रवासात सहप्रवाशांच्या फोनवरुन तो कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना फोन करायचा. संपर्क झाल्यानंतर तो लगेच आपलं ठिकाण बदलायचा. जेणेकरुन पोलिसांना मिसलीड करता येईल आणि पोलिसांना त्याचं खरं लोकेशन कळणार नाही, याची काळजी राहुल हांडोरे सातत्याने घेत होता.