• Sat. Sep 21st, 2024

संघटनेतील पदाची मागणी अन् लगोलग भुजबळही मैदानात; अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…

संघटनेतील पदाची मागणी अन् लगोलग भुजबळही मैदानात; अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले…

बारामती, पुणे : पक्ष संघटनेत पद मागितले तर त्यात वाईट काय आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही पक्ष संघटनेची जबाबदारी मागितली, त्यात काही गैर नसल्याचेही अजित पवार म्हणाले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.मी पक्षाच्या व्यासपीठावर माझी मागणी मांडली आहे. तिथे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी निर्णय पक्षाला घ्यायचा असतो. भुजबळ यांनी मागणी केली आहे, तो त्यांचा अधिकार आहे. सर्वांना बरोबर घेवून जायचे असेल तर पक्षात सर्व घटकांना प्रतिनिधित्व का मिळू नये. त्यामुळे त्यांनी केलेली मागणी योग्यच आहे. यासंबंधी आम्ही चर्चा करू. कोणत्याही पक्षात लोकशाही मार्गाने मते मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. पक्ष घेईल तो निर्णय आमच्यासाठी अंतिम असेल, अजितदादा पुढे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद ओबीसींना द्यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली होती. त्यावर अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्षपद हवं असल्याची जोरदार चर्चा आहे.
शिंदे-फडणवीस पायउतार होणार, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बारामतीतून गर्जना
राष्ट्रवादीच्या संघटनेत यापूर्वी छगन भुजबळ, बबनराव पाचपुते, आर. आर. पाटील, अरुण गुजराथी, सुनील तटकरे, जयंत पाटील, मधुकर पिचड यांनी अध्यक्षपदे भूषवली आहेत. मी तर जे योग्य वाटेल ते पद द्या, अशी मागणी केली असल्याचे पवार म्हणाले. मी गेली ३२ वर्षे आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते ही पदे भूषवली आहेत. आता संघटनेचे काम करण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली. तर वाईट काय? असा सवाल अजित पवार यांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांचा मेसेज आलाय? सावधान! २ महिन्यांत सहाव्यांदा राजेश देशमुखांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट
‘महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा शासकीय पूजा करतील’

दरम्यान, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची शासकीय पूजा अजितदादा हे करतील, असे साकडे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज तुळजा भवानीला घातले. आमदार अमोल मिटकरी हे पंढरपूरहून तुळजा भवानीच्या दर्शनासाठी सहपरिवार आले होते.

विरोधकांचे जाहिरात आणि पैसा याचे राजकारण चालणार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. महिलांना मंत्रिमंडळात स्थान नाही. खोके सरकारला उपरती लागणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नमामी चंद्रभागा व्हिजन आहे. यासाठी २२ कोटी खर्च केलाय. चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यासाठी शौचालय नाहीत. स्वच्छता नाहीत. महिलांना कपडे बदलण्यासाठी व्यवस्था नाही. चंद्रभागेत घाणेरडे पाणी आहे. आज ४ दिवस झाले चंद्रभागेत पाणी नाही, असा आरोप मिटरी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed