• Sat. Sep 21st, 2024

खुर्चीत बसून टेबलावर डोके, वर्गातच झोपी गेला, शिक्षक शाळेतच दारू पिऊन झिंगाट, पहा व्हिडिओ

खुर्चीत बसून टेबलावर डोके, वर्गातच झोपी गेला, शिक्षक शाळेतच दारू पिऊन झिंगाट, पहा व्हिडिओ

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दारु वर्गातच दारु पिऊन झोपला, नागरिकांनी केली पोलखोल


पुणे : बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सजग नागरिकाने अचानक शाळाभेट केल्याने हा सर्व प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील तरडोलीमधील भोईटे वस्ती येथील शाळेत ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भरत चव्हाण असे या शिक्षकाचे नाव असून भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत २५ विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली होती. याबाबत बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. या घटनेने शिक्षकांच्या प्रतिमेला ठेच पोहचली असून विद्यार्थ्यांचे भवितव्य लिहिणारे शिक्षकच असे करत असतील तर आम्ही मुलांना कुणाकडे पाठवायचे असा सवाल उपस्थित केला जात आहे. गावकऱ्यांनी याआधी देखील या शिक्षकाला सुधारण्याची संधी दिली होती. मात्र सरावलेल्या शिक्षकाने ती वाया घालवली आणि चिमुरड्या विद्यार्थ्यांना बेधुंद गुरुजी पहावा लागला.

प्रत्यक्षदर्शींनी याबाबत व्हिडिओ बनवला आणि शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून झोपी गेला होता. भरपूर दारू प्यायल्याने तो शुद्धीत नाही हे नागरिकांच्या लक्षात आले. त्या व्यक्तीने संबंधित घटनेचा व्हिडिओ केला. याची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. त्यावरून संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समितीदेखील नेमण्यात आलेली आहे. या शिक्षकाची वैद्यकीय तपासणी होईल जे तपासणीत येईल त्यावर कडक कारवाई होईल असे शिक्षणाधिकारी गावडे यांनी सांगितले आहे. तर मुख्याध्यापकाला देखील नोटीस बजावली असल्याचे गावडे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed