• Sat. Sep 21st, 2024

उदयनराजे शिवेंद्रराजेंमध्ये साताऱ्यात वाद, फडणवीसांची कराडमध्ये चर्चा, समेट होणार? लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन बी

उदयनराजे शिवेंद्रराजेंमध्ये साताऱ्यात वाद, फडणवीसांची कराडमध्ये चर्चा, समेट होणार?  लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन बी

सातारा : सातारच्या दोन्ही राजांशी चर्चा झाली. विकासकामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. वादाचे म्हणाल, तर अशा गोष्टी कधी कधी होत असतात. पण असे नाही की तिथे काही गंभीर घडले आहे. अशा गोष्टी होत असतात ते फार अडचणीचे आहे, असे नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादावर बोलताना स्पष्ट केले.

संभाजीनगर-खिंडवाडी येथील छत्रपती शाहू फळे, फुले व भाजीपाला मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजनावरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समोरासमोर काल भिडले. या गोंधळात शिवेंद्रराजे यांनी भूमीपूजनाचा नारळ फोडला. त्यामुळे दोन्ही बाजूने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर आज हे दोन्ही नेते कराड येथे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. गेली दोन तास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या तिघांमध्ये कमरा बंद बैठक सुरू होती. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्री कराडमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळीच खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सकाळीच कराड येथे पोहोचले होते. सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा उदयनराजे भोसले यांची बैठक घेतली. त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबतही बैठक घेऊन फडणवीस यांनी चर्चा केली. या दोघांशी चर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दोघांसोबत संयुक्त कमरा बंद बैठक घेतली. ही बैठक तब्बल दोन तास सुरू होती.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील या दोन नेत्यांमधील वाद भारतीय जनता पार्टीला परवडणारा नसल्याने त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. साताऱ्याच्या राजकारणात सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही. त्यामुळे भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस या दोन्ही राजामध्ये मध्यस्थी करून सलोख्याचा तोडगा काय काढणार काय याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

त्यातच सातारा लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघातून राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना पक्षातील काही नेते कार्यकर्त्याकडूनच व खास करून आमदार सातारा- जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडूनच तगडा विरोध असल्याने उमेदवार बदलाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपने उदयनराजेंच्या बरोबरच आणखी एक उमेदवार शोधण्याची तयारी सुरू करून सावध पावले टाकण्याची रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील व विक्रम पावसकर यांची नावे आघाडीवर आहेत. याबाबतही कमरा बंद चर्चा झाल्याची शक्यता आहे.
राहुल हंडोरेला जिवंत सोडता कामा नये, दर्शना पवारच्या भावाचा संताप, शिंदे सरकारला म्हणतो…
लोकसभा निवडणुकीला नऊ ते दहा महिने बाकी असतानाच सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याची चाचणी सुरू झाली असून आज संध्याकाळी दहिवडी येथे होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो असे सूत्राने सांगितले.
Rahul Handore : राहुल नातेवाईक होता का? दर्शनासोबत कधीपासून ओळख? पोलिसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
दरम्यान, मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजनावरून काल झालेल्या वादावरून खा. उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह ८० व्यक्तींवर कार्यक्रमात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
Pune: राहुल हंडोरेला पकडण्यासाठी पोलिसांनी वापरली ही युक्ती, पोलिसांनी दर्शना पवारच्या मारेकऱ्याला कसं पकडलं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed