• Sat. Sep 21st, 2024

काजल बोरस्तेला चिवनिंग शिष्यवृत्ती, हा मान मिळवणारी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिली महिला

काजल बोरस्तेला चिवनिंग शिष्यवृत्ती, हा मान मिळवणारी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिली महिला

नाशिक: ब्रिटीश सरकारमार्फत देण्यात येणारी चिवनिंग शिष्यवृत्ती मूळच्या नाशिकच्या आणि सध्या मुबंईमध्ये काम करीत असलेल्या काजल बोरस्तेला जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत एक वर्षाच्या कालावधीत तिला लंडनमध्ये पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळणार असून, अशी शिष्यवृत्ती मिळविणारी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिला महिला आहे.एखाद्या क्षेतात सखोल काम करणाऱ्या नेतृत्वांना त्या क्षेत्रात विशेष परिणाम साधण्याच्या उद्देशाने ब्रिटीश सरकामार्फत चिवनिंग शिष्यवृत्ती दिली जाते. काजलने गेल्या सात वर्षांत नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील दलित तसेच आदिवासी मुलींच्या शिक्षण, रोजगार, लिंगाधारित हिंसा याबाबत केलेल्या सखोल फिल्डवर्कची दखल घेत, तिची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे.


जवळपास वर्षभर चाललेल्या मुलाखती, प्रेझेंटेशन या प्रक्रियेतून तिची निवड करण्यात आली आहे. १६० देशांमधील ७० हजार जणांनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यापैकी जगभरातून १ हजार ४०० जणांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली असून, त्यामध्ये काजलचा समावेश आहे. भारतातून दरवर्षी ३० ते ४० जणांना आणि महाराष्ट्रातून १ किंवा २ व्यक्तींना ही संधी मिळते. या शिष्यवृत्तीअंतर्गत काजल लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये एक वर्षाचा ‘जेंडर डेव्हलपमेंट अँड ग्लोबलायझेशन’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे.

VIDEO: पाकिस्तानात RSS चा उल्लेख, नागपूरच्या झिरो माइल, दिक्षाभूमीचीही चर्चा, नेमकं कारण काय?
ही संधी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या शिष्यवृत्तीमध्ये केवळ पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक मदतच होणार नाही, तर नेटवर्किंगच्या अनेक संधीही उपलब्ध होणार आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा मला माझ्या कामात उपयोग करायचा असून, ज्यांच्यासाठी मी काम करते त्या मुलींचे जगणे सूकर करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे – काजल बोरस्ते

बिकट परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षणासाठी झेप, जालन्याच्या मिस्बाहचा नीट परीक्षेत डंका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed