• Mon. Nov 25th, 2024
    भाजप नेत्याकडूनच वचपा, संयमी थोरातांनी विखेंना त्यांच्याच होमग्राऊंडवर गपगार केलं

    अहमदनगर : राधाकृष्ण विखे पाटील…. सहकारातलं मोठं आणि दिग्गज नाव… पण त्याच विखेंना १० वर्षांपासून ताब्यात असलेल्या गणेश कारखान्याची सत्ता राखण्यात अपयश आलंय. भाजपची सत्ता आल्यापासून विखेंनी संगमनेरमध्ये जाऊन आपला कॅनव्हास मोठा करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब थोरातांच्या होमग्राऊंडवर जाऊन त्यांना तिथे घेरण्याचा प्रयत्न केला. पण संयमी थोरातांनी अजिबात गडबड न करता विखेंचा योग्य वेळी करेक्ट करेक्ट कार्यक्रम केला.राहता तालुक्याची कामधेनु असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांनी विखेंच्या पॅनलचा धुव्वा उडवलाय. १९ जागांपैकी विखेंना अवघी १ जागा मिळाली तर थोरात-कोल्हेंच्या पॅनेलन १८ जागांवर विजयी गुलाल उधळला.

    विखेंच्या मतदारसंघात थोरातांची एन्ट्री, कोल्हेंशी युती करुन तगडी फाईट, सत्ता जाण्याची भीती
    थोरात-कोल्हेंच्या युतीचा विखेंना दणका

    विखे संगमनेरमध्ये हस्तक्षेप करत असल्याने थोरांतांनीही गणेश कारखान्यावर लक्ष केंद्रीत केले.
    माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा मुलगा विवेक कोल्हे यांच्याबरोबर युती केली.
    त्यामुळे थोरात-कोल्हे पॅनल मजबूत झाला होता. त्यात राष्ट्रवादीचे संग्राम कोतेही थोरात यांच्याबरोबर होते.

    विखेंविरोधात सर्व विरोधक एकत्र आले. कोणत्याही परिस्थितीत कारखाना ताब्यात घेण्याचा चंग त्यांनी बांधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित काळे यांनीही नऊ ठिकाणी उमेदवार दिले होते, मात्र त्याचाही विखेंना काहीच फायदा झाला नाही. हा कारखाना आपल्या ताब्यातून जाऊ नये म्हणून विखे पिता-पुत्रांनी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांना भावनिक आवाहनही केले होते, मात्र त्याचाही शून्य फायदा विखेंना झाला.

    • गेल्या १० वर्षांपासून विखेंची गणेश कारखान्यावर सत्ता होती
    • पण यंदा सत्ता राखण्यात विखेंना अपयश, मतदारसंघातच पराभव
    • माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे आणि थोरातांची युती झाल्याने
    • विरोधकांचं बळ वाढलं, विखेंची ताकद कमी पडली, जनतेनेही साथ दिली नाही.

    विखे आमदारकीवर बोलले, निलेश लंकेंनी थेट सुजय विखेंच्या खासदारकीलाच आव्हान दिलं!
    दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पराभवावा त्यांचं दिल्लीतलं वाढलेलं वजनही कारणीभूत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. कोल्हेंनी भाजपच असूनही विखेंच्या विरोधात प्रचार करण्याची हिंमत केली, ती कुणाच्या आशीर्वादाने? असा सवालही विचारला जातोय. गणेश सहकारी साखर कारखान्यातला विखेंचा पराभव हा भाजपमधील अंतर्गत राजकारणाचा भाग आहे, अशीही चर्चा होतीये.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed