• Sun. Mar 8th, 2026
    Accident News: भरधाव पिकअपची दुचाकीला धडक, मामा-भाचे अन् मित्र हवेत उडून गाडीखाली चिरडले; जागीच ठार

    वाशिम : राज्यात रस्ते अपघाताच्या घटना वारंवार समोर येत असून आता वाशिम जिल्ह्यामध्येही एक भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. वाशिम जिल्ह्यातील महत्वाचा मार्ग असलेल्या वाशिम रिसोड महामार्गावर आज सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात ३ जण जागीच ठार झाले आहेत. या रिसोड मार्गावरील नागठाना गावाजवळ असलेल्या वळणावर रिसोडवरून वाशिमच्या दिशेने जाणारी बोलेरो पिकअप अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या दुचाकीवर धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे.या अपघातामध्ये येवती ता. रिसोड इथल्या आकाश जाधव वय १७ वर्ष, दिनकर गायकवाड, वय २६ वर्ष आणि गणेश शिंदे वय १८ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे तर एकलासपूर ता. रिसोड येथील गोपाल कुलाळ हा बोलेरो पिकअप चालक गंभीर जखमी झाला आहे.

    Mumbai Monsoon 2023: मुंबईकरांसाठी हवामान खात्याकडून Good News, पुढच्या ७२ तासांत मान्सून या भागांत बरसणार
    या अपघातील मृतक दिनकर गायकवाड आणि आकाश जाधव हे मामा-भाचे असून ते दुचाकी दुरुस्तीसाठी वाशिमला गेले होते. दुचाकी दुरुस्ती करून गावी परतत असतांना गणेश शिंदे हा त्यांना रस्त्यात भेटायला आणि मित्र असल्याने दिनकरने त्यालाही लिफ्ट दिली. वाशिमवरून १० किमी अंतर कापल्यानंतर नागठाना गावाजवळ असलेल्या वळणावर समोरून येणाऱ्या बोलेरो पिकपणे त्यांना जोरदार धडक दिली.
    Pune Crime : MPSC उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार प्रकरणाला धक्कादायक वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येताच पोलीस हैराण…
    हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चेंदामेंदा झाला आणि त्यावरील तिघेही फरफटत जाऊन एकजण पलटी झालेल्या पिकपखाली दबला गेला तर दोनजण रस्त्यावर पडले होते. अपघाताची माहिती मिळताच वाशिम ग्रामीण पोलिसांनी जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. एकाच गावातील तिघेजण मृत्युमुखी पडल्याने येवती गावावर शोककळा पसरली आहे.

    Crime Diary : मध्यरात्र, बंद खोली आणि सुंदर अनोळखी तरुणी; पुढे जे घडलं ते वाचून बसल्या जागी घाम फुटेल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed