कोंढवा परिसरात गंगाधाम सोसायटी जवळील कंपाऊंडला ही आग लागली. गंगाधाम येथील आईमाता मंदिराजवळील एका गोदामाला आग लागल्याची माहिती अग्शिमन दलाला रविवारी सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांनी मिळाली. त्यानंतर तातडीने पुणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. या ठिकाणी मंडपाच्या गोदामाला सर्वप्रथम आग लागली. ही आग शेजारी असलेल्या इतर तीन गोदामापर्यंत पसरली आहे. हवा जोरात वाहत असल्याने पाहता पाहता या परिसरातील २० गोदामांपर्यंत आग पसरली. भवानी पेठ, नाना पेठ परिसरातूनही या आगीचे लोट दिसून येत आहेत.
ही आग आणखी पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत आहेत. या आगीत विविध साहित्याची २० गोदामे आगीत जळून खाक झाली आहेत. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची मिळून एकुण २२ अग्निशमन वाहने घटनास्थळी मदतकार्यात होती. लोकांची दाट वस्ती असल्याने प्रशासनाकडून तात्काळ कंपाऊंड जवळील इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश मिळाले. त्यानंतर या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ही आग कशामुळे लागली ते अद्यापही अस्पष्ट आहे.