• Tue. Jan 21st, 2025
    VIDEO| कुणाल राऊतांना विरोध, यूथ काँग्रेसच्या बैठकीत राडा, दोन गटांमध्ये खुर्च्यांची फेकाफेक

    मुंबई : युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील टिळक भवनमध्ये येथे आयोजित युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात आक्रमक झालेल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

    मुंबईत युवक कॉंग्रेसच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत महाराष्ट्र युथ काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात पदाधिकारी आक्रमक झाले. दोन गट एकमेकांना भिडले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या.

    डॉक्टर काय सुरु आहे? तयारी सुरु ठेवा; मोहक हास्य सूचक सल्ला, पवारांच्या हाती काँग्रेस नेत्याचा हात

    कोण आहेत कुणाल राऊत?

    कुणाल राऊत हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जा मंत्रिपद भूषवलेल्या नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत.

    आई शिवसेना तालुकाप्रमुख, बालशिवसैनिक म्हणून कारकीर्द सुरु, शाईफेक झालेल्या अयोध्या पौळ कोण?
    युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात एक गट आक्रमक झाल्यामुळे वातावरण तापलं होतं. युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्षांनी कुणाल राऊत यांना बदलण्याची मागणी केली. यानंतर दोन गट भिडल्याचे पाहायला मिळाले. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे यांच्या गटाने कुणाल राऊत यांना विरोध करत अध्यक्ष बदलण्याची मागणी केल्याची माहिती आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed