• Sat. Sep 21st, 2024
Video: सुरक्षा रक्षकाने दिलं पेशंटला इंजेक्शन, लातूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

लातूर : लातूरच्या स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या रुग्णालयात चक्क सुरक्षा रक्षक रुग्णावर उपचार करताना दिसत आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वाला या गावचे रहिवासी असलेल्या शब्बीर शेख यांचा अपघात झाला आणि त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक २७ मध्ये उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांनी तपासणी करून नर्सला सलाईन आणि इंजेक्शन देण्याचे निर्देश देऊन ते तेथून निघून गेले.
डॉक्टर काय सुरु आहे? तयारी सुरु ठेवा; मोहक हास्य सूचक सल्ला, पवारांच्या हाती काँग्रेस नेत्याचा हात
डॉक्टरांच्या निर्देशानुसार नर्सने शब्बीर शेख यांच्यावर उपचार न करता चक्क सुरक्षा रक्षकाला सलाईन आणि इंजेक्शन देण्यासाठी सांगितलं. सुरक्षा रक्षकानेही शब्बीर शेख यांना सलाईनद्वारे इंजेक्शन दिले. या सर्व धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

शब्बीर शेख यांच्या नातेवाईकांनी याला विरोध केला. मात्र, सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर सदरील प्रकार सांगण्यासाठी रुग्ण शब्बीर शेख यांचे नातेवाईक धावत डॉक्टर कडे गेले आणि सर्व घडलेला प्रकार त्यांना सांगितला. डॉक्टरांनी तात्काळ येऊन शब्बीर शेख यांची तपासणी केली. तसेच नर्स आणि सुरक्षा रक्षक यांना फैलावर घेतलं.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी सदरील प्रकार गंभीर असून या प्रकरणाची त्री सद्दस्सीय समिती स्थापन करण्यात आली असून तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितलं आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; ठाण्यात खळबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed