• Sat. Sep 21st, 2024

नवरा टाईम देत नव्हता, बायकोनं केलं असं काही…; आता खातेय जेलची हवा; काय आहे प्रकरण?

नवरा टाईम देत नव्हता, बायकोनं केलं असं काही…; आता खातेय जेलची हवा; काय आहे प्रकरण?

Edited by Vrushal Karmarkar | | Updated: 14 Jun 2023, 10:38 pm

पती वेळ देत नसल्याने पत्नीने एक धमकी दिली ज्यामुळे तिला जेलची हवा खावी लागली आहे. पतीच्या मेल आयडीवरून पत्नीने थेट ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पत्नीला अटक करण्यात आली आहे.

 

Pune Crime
पुणे

हायलाइट्स:

  • पती वेळ देत नव्हता
  • पत्नीने ऑफिस उडवण्याची दिली धमकी
  • पुण्यातील घटना
पुणे : पती वेळ देत नाही म्हणून एका ३२ वर्षीय पत्नीने थेट त्याचे कार्यालय आणि कॅब बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी संबधित महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती. फरहीन अलरुमान शेख (३३) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
गायीने बॉम्ब खाल्ल्याने जबडा फुटला, मालकाने सोडून दिलं, लोकांना फुटला पाझर, मात्र…
याबाबत खराडी येथील ऑल स्टेट कंपनीच्या व्यवस्थापकाने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील ऑल स्टेट कंपनीमध्ये अलरुमान शेख हा पती कामाला आहे. त्याने दुसरे लग्न केल्याने या पती पत्नी मध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे पती फरहिन हिला वेळ देत नव्हता. त्यामुळे नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी पत्नीने त्याचे ऑफिस आणि कॅब उडवून देण्याचे ठरवले. त्यानुसार फरहीन हिने नोकरी जाण्याच्या हेतूने तिने पतीचा मेल आयडी वापरून फिर्यादीच्या कंपनीच्या मेलवर मेल पाठविला.

गुणरत्न सदावर्तेंचा पत्नीसह सातारा बस स्थानकात बुलेटवरून फेरफटका

त्यात कंपनीचे कार्यालय आणि कॅब उडविण्याची धमकी देणारा उल्लेख देखील केला. धमकीचा मेल पाहिल्यानंतर व्यवस्थापकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कंपनीच्या सर्व कॅबची बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून तपासणी केली. त्यात काहीही आढळून आले नाही. पोलिसांच्या तांत्रिक तपासात फरहीनने मेल केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांकडून संबधित महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed