• Mon. Nov 25th, 2024

    राजापूरमध्ये अर्जुना धरणावर मोठा अपघात, चार चाकी कोसळली, दोघांचा मृत्यू, तर आठ गंभीर जखमी

    राजापूरमध्ये अर्जुना धरणावर मोठा अपघात, चार चाकी कोसळली, दोघांचा मृत्यू, तर आठ गंभीर जखमी

    राजापूर : राजापूर तालुक्यातील अर्जुना धरणावर चार चाकी गाडीमधून गेलेल्या कामगारांची गाडी कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य आठजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. दरम्यान अन्य जखमींमध्ये एक कामगार अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे.

    अपघात ग्रस्त वाहनाचा नंबर MH14 – ju1359 असा आहे. या अपघातामध्ये सुदाम कुमार (वय २६ वर्षे), बनई (वय २५ वर्षे) हे मरण पावले आहेत. तर सूर्यकुमार बिन (बिहार), उकाश कोरे (सांगली), समरपाल कस्य (मुरादाबाद), राहुल गणेशवाडे (मिरज), हिरांकुमार बिन, लहुकुमार बिन, दिपकुमार बिन, मक्सुदन हे आठ जण गंभीर आहेत.

    Ratnagiri: रिक्षात बसलेल्या तरुणीशी रिक्षाचालकाचे अश्लील वर्तन, पोलिसांनी सिंघम स्टाइल कारवाई करत दिला दणका
    या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुना कॅनॉलमध्ये काम करणारे दहा कामगार धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक त्यांच्या गाडीला अपघात झाला व गाडी खाली कोसळली. त्यामध्ये दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कुणी कामगार बुडालेला नसल्याची माहिती आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी उशिरा साडेसहाच्या दरम्यान घडला आहे.

    IPL Racket in Pune: मी पिझ्झा बॉय आहे, कुणी घरी आहे का?; IPL च्या मोठ्या रॅकेटचा असा झाला पर्दाफाश
    अर्जुना धरणावर कामगार गाडीतून फिरण्यासाठी आले होते अशी माहिती मिळाली आहे. इतर आठ कामगार गंभीररीत्या जखमी आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे वृत्त कळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शितल जाधव रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या.

    धक्कादायक! वेटरला कार्डद्वारे पेमेंट करायला सांगत असाल तर सावधान! त्याने पैशासाठी जे केले ते जाणून हादराल
    हे कामगार यूपी, बिहारकडील

    हे सगळे कामगार यूपी व बिहार कडील असल्याची माहिती समोर आली आहे. राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे तात्काळ दाखल झाले. जखमींना जिल्हा रुग्णायात हलविण्याची कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही राजापूर पोलीस स्थानकात सुरू होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *