• Mon. Nov 25th, 2024
    मुख्यमंत्र्यांची दुआ, त्यामुळे मुलगी वाचली, म्हणून तिचे नाव दुआ ठेवणार; पालकांची कृतज्ञता

    कोल्हापूर: आज कोल्हापुरातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जिथे सर्वत्र शिट्ट्या आणि घोषणा सुरू होत्या यावेळी एक क्षण असा आला जिथे प्रत्येकाला त्या क्षणाचे कौतुक आणि भावना दाटून आल्या. व्यासपीठावरील सूत्रसंचालकांनी एका लहान मुलीची गोष्ट सांगितली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील लहान मुलीला हातात घेतले. मुख्यमंत्री काही क्षण तिच्याकडे पाहत होते. ती मुलगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे वाचली होती. त्यावेळी ती अवघी २६ दिवसांची होती.झाले असे की, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एक मुस्लिम नवदांपत्य आपल्या चिमुकली सोबत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी दुपारी कार्यक्रमाच्या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचा आग्रह करू लागले. मात्र मुख्यमंत्री असल्याने बंदोबस्त मोठा होता. शिवाय प्रत्येकाला भेटण्यासाठी ओळखपत्र देण्यात आले होते. यामुळे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी नवदांपत्याचे तात्काळ उपस्थित स्वयंसेवकांची भेट घालून दिली.

    मी निर्दोष; अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोपनीय कागदपत्रे’ प्रकरणी कोर्टात मांडली बाजू
    यावेळी भेट का हवी ? कारण काय विचारले असता त्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून त्यांच्या २६ दिवसांच्या चिमुकलीच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून आर्थिक मदत मिळाल्यामुळे आपल्या मुलीचे प्राण वाचले असून, आम्हाला कृतज्ञता म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानायचे आहेत असे सांगितले. यावेळी ही मुलगी त्यांच्या हातात होती.

    यामुळे स्वयंसेवकांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी तात्काळ शासन आपल्या दारी उपक्रमाचे राज्य समन्वयक डॉ अमोल शिंदे, अमित हुक्केरीकर व प्रभाकर काळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भेटण्याची इच्छा दर्शवल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला आणि सर्वांना मदत देऊन झाल्यानंतर सूत्रसंचालकाने लहान मुलीची गोष्ट सांगितली आणि श्री व सौ सादिक गुलाब मकुभाई या दाम्पत्याला व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले.

    अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळाची शक्यता; ठाणेकर नागरिकांना सतर्कतेचा इशारा
    यावेळी ते आपल्या चिमुकलेला घेऊन तेथे आले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत आभार पत्र दिले आणि ते त्यांनी स्विकारले ही. नंतर मुख्यमंत्री चिमुकलीला हातात घेत काही वेळ तिच्याकडे कौतुकाने पहात होते. यावेळी शेजारी असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांना ही बाळाला दाखविले. निघताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलीचे नाव काय ठेवलं आहे ? असे विचारले. या प्रश्नाला अतिशय भावनिक उत्तर देताना, तुमची आमच्या कुटुंबावर दुआ आहे; म्हणून आमच्या मुलीचे नाव हे आम्ही दुआच ठेवणार असे चिमुकलीच्या आईने उत्तर दिले.

    संतापजनक! ऑफिसात अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडे कृत्य, ६८ वर्षीय सिनियर वकिलाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
    आपल्या चिमुकलीचे प्राण वाचवल्याबद्दल श्री व सौ सादिक गुलाब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि सोबत स्वहस्ताक्षरात लिहून आणलेले एक आभार पत्र , कृतज्ञता म्हणून दिले. यावेळी संपूर्ण सभागृह व्यासपीठावर सुरू असलेल्या त्या भावनिक क्षणाला पहात होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed