• Mon. Nov 25th, 2024

    घाटात गाय आडवी आल्याने कारचा अपघात, लिफ्ट दिलेल्या वृद्धाचा करुण अंत

    घाटात गाय आडवी आल्याने कारचा अपघात, लिफ्ट दिलेल्या वृद्धाचा करुण अंत

    रत्नागिरी: चिपळूण-कराड रोडवर कुंभार्ली घाटात सकाळी धुके होते. याच दरम्यान अचानक महामार्गावर गाय आडवी आल्याने कार चालकाने कार बाजूला ओढली असता कार रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात शिराळा येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात सकाळी ७.४५ वाजण्याच्या दरम्यान झाला. कार चालक बाबासाहेब बाळू सुवासे हे दापोली येथे समाजकल्याणच्या वसतिगृहात अधीक्षक म्हणून काम करतात. आज सकाळी ते आपल्या कारने एकटेच गावी कोल्हापूरकडे निघाले होते.
    पुण्यासह पिंपरी चिंचवडमधून मुंबईला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेचा सिंहगड एक्स्प्रेसबाबत मोठा निर्णय

    बहादूरशेख -चिपळूण येथे आले असता त्यांना काही प्रवाशांनी हात दाखविला. त्यानंतर त्यांनी गाडी तिथे उभी केली. यावेळी तिन्ही प्रवाशांनी त्यांच्याकडे आम्हाला इस्लामपूरला सोडा, अशी विनंती केली. परंतु आपण तिकडे जाणार नाही, असे सुवासे यांनी सांगितले. त्यानंतर आपण आम्हाला हायवेला तरी सोडा, अशी गळ त्यांनी घातली. विनंती केल्यानंतर सुवासे यांनी पतीपत्नी आणि वृद्ध सुरेश लक्ष्मण कांबळे (७०) यांना कारमध्ये घेतले. कार पोफळी येथील लिला हॉटेलच्या पुढे साधारण दोन कि.मी. अंतरावर आली. मात्र महामार्गावर पावसामुळे धुक्याचे वातावरण होते. कार घाट चढत असताना अचानक एक गाय कारच्या समोर आल्याने चालक सुवासे यांनी कार उजव्या बाजूला घेतली. यादरम्यान कार अचानक उलटली आणि रस्त्याच्या खाली जाऊन शेतात अडकली.

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी दुर्घटना; ऑईल टँकरला भीषण आग; ३ जणांचा होरपळून मृत्यू

    या अपघातात वृद्ध सुरेश लक्ष्मण कांबळे यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे वाचले आहेत. अपघात झाल्यानंतर चालक सुवासे आणि पतीपत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. चालक सुवासे हे मयत सुरेश कांबळे यांना बाहेर काढत असताना ते प्रवासी पतीपत्नी तेथून निघून गेले. परंतु त्यांचा मोबाईल कारमध्येच पडल्याचे समजले आहे. अपघातात कारचे सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात कार चालक बाबासाहेब सुवासे यांनी फिर्याद दिली. हा अपघात अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने तेथे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed