• Sat. Sep 21st, 2024

Pune : चार महिला अन् एक लहान मुलगा, अचानक रिक्षावर झाड कोसळलं, सहकारनगरमध्ये घडली मोठी घटना

Pune : चार महिला अन् एक लहान मुलगा, अचानक रिक्षावर झाड कोसळलं, सहकारनगरमध्ये घडली मोठी घटना

Pune Tree Collapsed Over An Auto Rickshaw : पुण्यातील सहकारनगरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. रिक्षेवर झाड कोसळ्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेला बाहेर काढले. पण तिचे प्राण वाचवता आले नाही.

 

Pune News
चार महिला अन् एक लहान मुलगा, अचानक रिक्षावर झाड कोसळलं, सहकारनगरमध्ये घडली मोठी घटना
पुणे : शहरातील सहकारनगरमध्ये मोठी घटना घडली. मुक्तांगण शाळेजवळ रिक्षावर झाड कोसळून एका महिलेला मृत्यू झाला. आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला ०४•५४ वाजता या घटनेची वर्दि मिळाली. माहिती मिळताच जनता अग्निशमन केंद्र आणि मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आली होती.अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मुक्तांगण शाळेजवळील बसस्थानकामागे तार कंपाउंडमध्ये असलेले एक मोठे झाड रिक्षावर कोसळले होते. रिक्षेतील एक महिला या घटनेत गंभीर जखमी अवस्थेत अडकल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहिले. रिक्षामध्ये एकूण चार महिला आणि एक लहान मुलगा प्रवास करत होता. त्यापैंकी तीन महिला व लहान मुलगा (वय ३ वर्ष) यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने बाहेर काढले होते. तसेच रिक्षाचालक किरकोळ स्वरूपात जखमी होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर गंभीर जखमी असलेल्या महिलेची सुटका करून तातडीने शासकीय रुग्णवाहिका क्रमांक १०८ मधून रुग्णालयात रवाना केले. या घटनेत रिक्षाचे व एका टपरीचेही नुकसान झाले आहे. जखमी महिलेला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी सॉ, घन, पहार, रश्शी अशा विविध अग्निशमन साहित्याचा वापर केला. पण या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले. लीला काकडे (वय अंदाजे ५० वर्ष, राहणार आंबेगाव, जांभुळवाडी (ससून रुग्णालय), असं मृत महिलेचं नाव आहे.

पुणे विमानतळावर एक दोन नाही तर सात विमानांना उशीर, संतप्त प्रवाशांची थेट मंत्रालयाकडे धाव
सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी रविंद्र आढाव, प्रशांत गायकर व वाहनचालक सागर देवकुळे, अक्षय राऊत तसेच तांडेल संदिप घडशी आणि फायरमन महेंद्र सकपाळ, शैलेश गोरे, चंद्रकांत आनंदास, भुषण सोनावणे, अक्षय शिंदे, हेमंत शिंदे, गणेश मोरे यांनी सहभाग घेतला.

एकच मागणं विठुराया, आम्हा तुझा विसर न व्हावा; हरिनामाच्या गजरात माऊली निघाले पंढरीला

रिक्षात एकूण ४ महिला आणि एक लहान मुलगा होता. या घटनेत लीला काकडे या महिलेचा मृत्यू झाला. तर नम्रता सचिन पोळ (वय ४६), कमल अडिकामे (वय ६९), मीना पुरुषोत्तम पोळ (वय ६१) या महिलांना रिक्षातून बाहेर काढण्यात आलं. पण लहान मुलाचे व रिक्षाचालकाचे नाव समजू शकले नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed