• Sat. Sep 21st, 2024

पुणे विमानतळावर एक दोन नाही तर सात विमानांना उशीर, संतप्त प्रवाशांची थेट मंत्रालयाकडे धाव

पुणे विमानतळावर एक दोन नाही तर सात विमानांना उशीर, संतप्त प्रवाशांची थेट मंत्रालयाकडे धाव

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यातून सुटणाऱ्या विमानांना दररोज उशीर होऊ लागल्यामुळे प्रवाशांना अनेक तास ‘वेटींग’ करावे लागत आहे. लोहगाव विमानतळावरून रविवारी रात्री दुबईला उड्डाण करणाऱ्या विमानासह इतर सात विमानांना उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयास व्टिट करून विमानांना होणारा उशीराचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.

लोहगाव विमानतळावरून दररोज १८० च्या जवळपास विमानांची ये-जा सुरू असते. त्यामधून २८ ते २८ हजार प्रवासी प्रवास करतात. गेल्या काही दिवसांपासून पुणे विमानतळावरून प्रवास करताना विमानांना उशीर होत असल्यामुळे त्रासाला सामना करावा लागत आहे. पुणे विमानतवरून रात्री आठ वाजता दुबईला विमान असते. रविवारी रात्री आठ वाजताच्या विमानाने सोमवारी सकाळी सहा वाजता उड्डाण केले. त्यामुळे प्रवाशांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला. या विमानामध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचा समावेश होता. विमानाला उशीर होत असल्यामुळे प्रवाशांनी स्पाईट जेट या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. पण, त्यांच्याकडून काहीही सांगितले जात नव्हते. सततचा त्रास कमी करण्यासाठी प्रवाशांकडून नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघात, चार वाहने एकमेकांना धडकली, बस उलटली, चौघांचा मृत्यू
पुणे दुबई बरोबरच पुणे दिल्ली विमानाला आठ तास उशीर झाला. तर, पुणे गोवा विमानाला सात तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. गेल्या काही दिवसांपासून तर पुणे गोवा विमानाला सतत उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर सात ते आठ तास थांबावे लागत आहे. या गोष्टीकडे विमानतळ प्रशासनाने देखील लक्ष देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. विमानाला उशीर होत असताना विमान कंपन्यांकडून काहीही माहिती दिली जात नाही.

एकच मागणं विठुराया, आम्हा तुझा विसर न व्हावा; हरिनामाच्या गजरात माऊली निघाले पंढरीला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed