• Mon. Nov 25th, 2024
    एक टीप अन् दूध डेअरीजवळ फिल्डिंग, कारचं दार उघडताच गोण्याच-गोण्या; दोरी सोडताच भयंकर दिसलं…

    धुळे : धुळे शहरातील साक्री रोडवर शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून कारमधून नेण्यात येणारा ७९ हजार २०० रुपये किमतीचा गुटखा आणि १ लाख ४० हजारांची कार, असा एकूण २ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

    यासंदर्भात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, साक्री रोडवरून कारमधून बेकायदेशीररीत्या सुगंधी पान मसाला आणि तंबाखू मालाची वाहतूक होणार आहे. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास साक्री रोडवरील सुरेंद्र दूध डेअरीजवळ सापळा रचला.

    रोहित शर्माने बीसीसीआयवर फोडले लाजीरवाण्या पराभवाचे खापर, म्हणाला आम्हाला किमान एवढं…
    काही वेळाने एमएच १८ टी १२५३ क्रमांकाची कार येताना दिसली. त्यांनी कार अडविली. कारची तपासणी केली असता पोलिसांना कारमध्ये गुटखा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चालक नितेश प्रकाशलाल आहुजा (२९), रा. कुमारनगर याला आणि कारसह सर्व गुटखा जप्त केला. कारमध्ये ५ दोन मोठ्या गोण्या आणि सहा लहान गोण्यांमध्ये सुंगधीत पान मसाल्याचे पाऊच आढळून आले.

    याशिवाय ९ हजार ९०० आणि ११ हजार ८८० रुपये किमतीचे सुंगधित मसाल्याचे पाऊच आढळून आले. १ हजार ३२० रुपये किमतीची सुंगधित तंबाखू जप्त करण्यात आली. तसेच १ लाख ४० हजार किमतीची कार, धुळे शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण २ लाख १९ हजार २०० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला तसेच कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

    Fadnavis : राष्ट्रवादीने भाकरी फिरवली नाही, तर…; देवेंद्र फडणवीसांनी फोडले नव्या चर्चेला तोंड

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *