भाजप तर्फे देशभरात ‘मोदी @ ९’ अभियान राबविले जातं आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील पहिली सभा शनिवारी नांदेड मध्ये पार पडली. सभेदरम्यान शहा यांनी उद्धव ठाकरे यांना हे आवाहन केले. यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री अतुल सावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन,अभियानाचे मुख्य संयोजक आमदार प्रविण दरेकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती.
शहा पुढे म्हणाले की, जो जास्त जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री असेल, असे आमचे ठरले होते. तरीही उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. ठाकरे हे नामांतराला समर्थन देण्याऐवजी विरोध करत आहेत असं देखील शहा म्हणाले. तीन तलाक कायदा झाला पाहिजे की नाही, राम मंदिर झाले पाहिजे की नाही, समान नागरी कायदा झाला पाहिजे की नाही, तसेच मुस्लिम आरक्षण सविधानानुसार असले पाहिजे की नाही, वीर सावरकरांचा इतिहास काढून टाकत आहेत, त्यांचा सन्मान करायचा की नाही, यावर ठाकरे यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी, असे ही मंत्री शाह म्हणाले.
राहुल गांधी देशाचे नाव बदनाम करत आहेत
काँग्रेसच्या चार पिढया करू शकल्या नाहीत तेवढे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. युपीएचे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार होते. नऊ वर्षात विरोधक एकही भ्रष्टाचाराचा आरोप करू शकले नाहीत. हे पादरर्शक सरकार आहे. जगभरात नरेंद्र मोदींना प्रतिसाद मिळत आहे. उलट राहुल गांधी यांना देशात कोणीही ऐकत नाहीत, म्हणून ते देशाबाहेर जाऊन विरोधात बोलत आहेत, अशी टीका शाह यांनी केली.
अशोकरांची मजल टूजी, थ्रीजी, ससोनियाजी पर्यंतच – फडणवीस
नऊ वर्षात आमच्याकडे सांगण्यासारखे भरपूर आहे म्हणून आम्ही नांदेडमध्ये मंत्री अमित शहा यांची सभा घेत आहोत. परंतु, अशोक चव्हाण तुमच्याकडे सांगण्यासारखे काही नाही. आमची जागा धोक्यात नसून तुमची मजल टूजी, थ्रीजी व सोनीयाजी यांच्या पलिकडे जाणार नाही. जालना-नांदेड समृध्दी मार्गाची तुम्ही घोषणा केली, पण कवडीची तरतूद केली नाही. आम्ही निधीची तरतूद करून काम सुरू केले आहे, अशा शब्दात अशोक चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.
राज्यात अधून-मधून विजय मिळत असल्याने राज्यात असाच पॅटर्न येईल, असे स्वप्न विरोधक पाहत आहेत. परंतु, राज्यात फक्त छत्रपती शिवरायांचा पॅटर्न चालतो. तो मोंदींनी आणला आहे, म्हणून आगामी निवडणूकांमध्ये मोदी पॅर्टनच चालेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. गुजरात, उत्तरप्रदेश या राज्यांपेक्षा आमच्या जास्त निवडून आणण्यासाठी आमची स्पर्धा आहे. ४५ खासदार आम्ही निवडून आणू , असा संकल्प केला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
प्रतापराव तुम्ही चिंता करू नका
या विरोधकांकडून नांदेडची जागा धोक्यात आहे म्हणून भाजपकडून अमित शाह यांची सभा घेतली जात आहे, असा आरोप होत असला तरी, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामुळे जिल्हयातील विविध विकास कामांना निधी देण्यात आला आहे. रखडलेला लेंडी प्रकल्प, नांदेड-बिदर रेल्वे मार्ग, वंदेभारत रेल्वेसह तुम्ही सांगितलेल्या सर्वच मागण्या पूर्ण करण्यासाठी आपले सरकार कटिबध्द राहील असे फडणवीस म्हणाले.