• Sun. Jun 14th, 2026

    शरद पवारांच्या त्या निर्णयाने अजित पवार नाराज?; अजितदादा दिल्लीतून तडक पुण्यात आले व बोलले

    शरद पवारांच्या त्या निर्णयाने अजित पवार नाराज?; अजितदादा दिल्लीतून तडक पुण्यात आले व बोलले

    पुणे : मला राज्याच्या राजकारणात रस आहे, सुप्रिया सुळे हे राष्ट्राच्या राजकारणात राहतील, मी नाराज नाही, माझ्या बदल अशा चर्चा आणि गॉसिप करणं बंद करा अजित पवार यांनी थेट प्रतिक्रिया दिली.आज राष्ट्रवादी काँगेच्या २४व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे मोठा निर्णय घेण्यात आला, शरद पवार यांच्या राजीनामा सत्रानंतर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल यांनी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाल्या. अजित पवार हे दिल्ली येथे मिडियाला प्रतिक्रिया न देता निघून गेले त्यामुळे नाराजीचा चर्चांना अजूनच हवा मिळाली. मात्र पुण्यात आल्यानंतर या सगळ्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिला आहे.

    साताऱ्याच्या पुत्राची ग्रेट कामगिरी; खडतर परिश्रमानंतर अजिंक्य कमी वयात बनला लष्करात लेफ्टनंट, पाहा व्हिडिओ
    पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, आमची एक समिती होती. त्यावेळी दोन निर्णय घेण्यात आले होते. एक तर शरद पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांची नेमणूक करावी. तेव्हा सगळे म्हणाले होते की राजीनामा इतकाच मुद्दा आता मांडा म्हणून मी लोकशाहीचा आधार ठेवून गप्प बसलो होतो.

    कैदी तुरुंगातील झाडावर आंबे तोडण्यासाठी चढला, सहज खिडकीत लक्ष गेले, जे दिसले ते पाहून हादरला, प्रशासनात खळबळ
    सुप्रिया सुळे या राष्ट्राच्या राजकारणात राहतील आणि आणि मी राज्याच्या राजकारणात राहणार आहे असा निर्णय घेण्यात आला होता. माझ्यावर राज्याच्या विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी आहे. त्यामुळे माझ्यावर कोणतीही जबाबदारी दिली नाही असा बोलू नका. मी नाराज नाही. माझ्याबद्दल गॉसिप करू नका अशा स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी आपण नाराज असल्याच्या बातम्यांचं खंडन केलं आहे.

    Gold Price Today : सोने २५०० रुपयांनी स्वस्त झाले, सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे का?, तज्ज्ञ काय म्हणतात

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed