• Fri. Mar 13th, 2026

    Vande Bharat Expressच्या डब्यांच्या संख्येत वाढ, मुंबई-अहमदाबाद ट्रेनला आता 20 डबे; प्रवास होणार सुखकर

    Vande Bharat Expressच्या डब्यांच्या संख्येत वाढ, मुंबई-अहमदाबाद ट्रेनला आता 20 डबे; प्रवास होणार सुखकर

    Mumbai Central-Ahmedabad Vande Bharat: वंदे भारत ट्रेनच्या वाढत्या मागणीमुळे काही ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. याअंतर्गत आता मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणाऱ्या या वंदे भारतच्या डब्यांची संख्या वाढवून ती 20 करण्यात आली आहे. यामुळे मुंबई ते गुजरात प्रवास करणार्‍यांना मोठा फायदा होणार आहे. ही ट्रेन देशातील 42वी वंदे भारत एक्सप्रेस असून पश्चिम रेल्वे चालवते.

    278 प्रवासी संख्या

    मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद (22969/22961) या वंदे भारत एक्सप्रेसची सुरूवात 13 मार्च 2024 रोजी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 12 मार्च 2024मध्ये हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर 2 वर्षांपासून या वंदे भारत एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने या गाडीच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या ट्रेनला 16 डबे आहेत. आता 4 नवे एसी डबे जोडले जाणार आहेत. अतिरिक्त डबे जोडताच या एक्सप्रेसची प्रवासी संख्या 278 होणार आहे.Maharashtra TimesMumbai News: मुंबईत जलमार्गाचे जाळे विस्तारणार, 11 नव्या मार्गांवर 24 टर्मिनल उभारणार; नवीन जेट्टीसह वाढवण बंदराचाही विकास

    रेल्वेने आपल्या अधिकृत घोषणेत याबद्दल माहिती दिली आहे. परंतु, त्यांनी यावेळी असंही सांगितलं की हे बद्दल तात्पुरते आहेत. 9 मार्च 2026पासून ते 31 मार्च 2026पर्यंत या ट्रेनचे डबे वाढवण्यात येणार आहेत. या सेमी हाय-स्पीड ट्रेनची पीक सीझनदरम्यान मोठी मागणी असते. गर्दी कमी करून प्रवाशांना सुखद आणि सुलभ प्रवास करता यावा या करणाने तात्पुरती डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

    5 तासांत होतो प्रवास

    मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग 491 किमी लांब आहे. केवळ 5 तास 40 मिनिटांत मुंबई ते अहमदाबाद पोहचवणाऱ्या या ट्रेनला नागरिकांसह उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्येही मोठी मागणी आहे. ताशी 90 किमी धावणाऱ्या या रेल्वेमुळे प्रवासाचा एक आरामदायी आणि जलद पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस बोरिवली, सुरत, वापी जंक्शन आणि वडोदरा जंक्शन या स्थानकांवर थांबते.

    Maharashtra TimesPune News: पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर; अनेक उन्नत मार्गांचा विस्तार, पुण्यातील रखडलेले प्रकल्प महिनाभरात मार्गी लागणार

    वंदे भारतची सुरुवात 2019मध्ये झाली असून तेव्हापासून एकूण 160 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या वंदे भारतचं विस्तारीकरण सुरू असून महत्त्वाच्या मार्गांवर ट्रेनच्या डब्यांची संख्या 20 करण्यात येत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा