अचानक दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे वाहन चालवणे तसेच रस्त्यावर थांबणे सुद्धा अडचणीचे होते. या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडाल्याने समोरील दृश्य दिसेनासे झाले होते. वाऱ्याबरोबर विजांचाही कडकडाट होत असल्याचे पाहायला मिळाले.
उकाड्यापासून नागरिकांना दिलासा; वातावरणात गारवा
गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र, सकाळी उन्हाचे चटके लागत असतानाच दुपारी अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यामुळे आता वातावरणात जरा गारवा वाटत आहे. या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वादळी वारा आणि विजांचा कडकडाट ही मान्सूनची चाहूल असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रचंड वादळी वाऱ्यामुळे जळगावातील जनजीवन खंडित झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस
जळगाव जिल्ह्यात काय ठिकाणी मुसळधार तर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर काही ठिकाणी मात्र पावसाबरोबरच गारा सुद्धा पडल्याचा पाहायला मिळालं आहे. पाचोरा तालुक्यातील सांगवी येथे गार पडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, वादळी वारा आणि पाऊस यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.